नुकताच लग्नबंधनात अडकलेला Ali Fazal चं धक्कादायक वक्तव्य

त्याचं लग्न हे एखाद्या ड्रीमी वेडिंगप्रमाणे झालं आहे. 

Updated: Oct 7, 2022, 09:12 PM IST
नुकताच लग्नबंधनात अडकलेला Ali Fazal चं धक्कादायक वक्तव्य  title=

Ali Fazal on Marriage: बॉलीवूडमधील ड्रीमी कपल रिचा चड्ढा आणि अली फजल नुकतेच विवाहबंधनात (Richa Chadha & Ali Fazal Marriage) अडकले आहेत. त्याचं लग्न हे एखाद्या ड्रीमी वेडिंगप्रमाणे झालं आहे. परंतु नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्यानं एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सगळीकडे एकच खळबळ माजली आहे. (newly married ali fazal says he want prove a myth about marriage wrong netizens reacts)

अली फजलच्या म्हणण्यानुसार लग्न या संस्थेवर अनेक अफवा पसरलेल्या असतात. त्याच्या म्हणण्यानुसार त्याला अशीच एक अफवा दूर करायची आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं सांगितले की, ''माझ्या आयुष्यात फार कमी लग्नं पाहिली आहेत जी यशस्वी होतात म्हणजे प्रत्येकाचे स्वभाव हे वेगवेगळे असतात. त्यात दोष गुणदोषही असतात. नात्यात काही परिपुर्ण नसतं. त्यामुळे मी माझ्या लग्नावरून ही अफवा वजा वास्तव खोडून टाकण्याचा प्रयत्न करणार आहे.'' (Ali Fazal on Marriage)

आणखी वाचा  - 'हर हर महादेव' चित्रपटातील भुमिकेबद्दल अभिनेता सुबोध भावेचा मोठा निर्णय

आपल्या पत्नीबद्दल रिचा चड्ढा बोलताना अली फजल म्हणाला की रिचासोबत माझं एक वेगळं अध्यात्मिक नातं आहे. तिच्याबद्दल मी नेहमीच आभार मानतो कारण तिनं मला आधीपेक्षा अधिक आध्यात्मिकरीत्या जागरूक केले आहे. मी आनंदी आहे पण मी कुठेही केंद्रित नाही. मला वाटतं लग्न ही अशी एक कल्पना आहे ज्याच्यासोबत आपल्याला फक्त त्या एका फ्लोमध्ये जायचे आहे आणि केवळ आनंदी राहायचे आहे. (Ali Fazal and Richa Chadha Relationship)

तो पुढे म्हणाला, "आपण सर्वजण स्वभावाने मनुष्यप्राणी म्हणून सदोष आहोत आणि कोणतीही गोष्ट परिपूर्ण असू शकत नाही. परंतु तुम्ही त्या प्रवाहात आनंद लुटण्याचा प्रयत्न करू शकता आणि त्याची भरभराट करू शकता. मला एवढेच माहित आहे की यापुढे आम्हाला दोघांना एकमेकांचं व्हायचं आहे आणि तसाच प्रयत्न करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.'' 

अली फजल आणि रिचा चड्ढा यांनी त्यांच्या कुटुंबासाठी आणि जवळच्या मित्रांसाठी दिल्ली आणि लखनौ येथे लग्नसोहळा आणि त्यांच्या उद्योगातील मित्रांसाठी मुंबईत रिसेप्शन आयोजित केले होते.  (Ali Fazal And Richa Chadha Marriage)

आणखी वाचा - प्रेग्नंट आलियाला त्यानं Kiss केलं तेव्हा... घरचे झाले शॉक!

2.5 वर्षांपुर्वीच अली फजल आणि रिचा चड्ढा यांनी कायदेशीररित्या लग्न केले आहे. 29 सप्टेंबर रोजी त्यांच्या मित्र आणि कुटुंबासह त्यांनी दिल्ली आणि लखनौ आणि आता मुंबईत आज रिशेप्शन साजरे केले.  (Ali Fazal And Richa Chadha Marriage Reception)