नाहीतर मला दिशाला रिप्लेस करावे लागेल-असित कुमार मोदी

निर्माते असित कुमार मोदी यांनी कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रीया दिल्या  नाहीत मात्र आता त्यांनी दिशा मालिकेत दिसणार की नाही याचा खुलासा केला आहे.

Updated: Feb 2, 2019, 07:12 PM IST
नाहीतर मला दिशाला रिप्लेस करावे लागेल-असित कुमार मोदी title=

मुंबई: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' हिंदी मालिका सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. काही दिवसांपूर्वी दयाबेन म्हणजेच दिशा वकानी मालिका करणार नसल्याची चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या. सूत्रांच्या सांगण्यानुसार दिशाने निर्मात्यांसमोर काही आटी ठेवल्या होत्या. तेव्हा निर्माते असित कुमार मोदी यांनी कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रीया दिल्या  नाहीत मात्र आता त्यांनी दिशा मालिकेत दिसणार की नाही याचा खुलासा केला आहे. एका वृत्तानुसार निर्मात्यांनी दिशा सोबत कोणताच वाद नसल्याचे स्पष्ट केले आहे. दिशा गेल्या वर्षभरापासून आमच्या सोबत काम करत नसल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही आईला आपल्या मुला सोबत जास्तीत-जास्त वेळ घालवायला आवडेल हे स्वाभावीकच आहे. पण दिशाची मुलगी आता एक वर्षाची झाली आहे. तर आम्हला आपेक्षा आहे की दिशा लवकरात लवकर कमबॅक करेल. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by DISHA VAKANI (@dishavakanioffical) on

निर्मात्यांच्या सांगण्यानुसार 'आम्ही दिशाला हवा तेवढा वेळ दिला होता, महत्वाचे म्हणजे पैश्याची कोणतीही समस्या नाही, माझी टीम सतत दिशाच्या संपर्कात आहे.तारक मेहता ची संपूर्ण टीम दिशाची वाट पाहत आहे. पण काही दिवसांत दिशाने तिचा निर्णय कळवला नाहीतर मला दिशाला रिप्लेस करावे लागेल. माझ्या मते कोणताही अभिनेता हा मालिकेपेक्षा मोठा नसतो.'