टेरेन्सच्या मिठीत नोरा फतेही, त्या व्हिडीओमुळे रंगली सोशल मिडीयावर चर्चा

व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण  

Updated: Dec 26, 2021, 02:20 PM IST
टेरेन्सच्या मिठीत नोरा फतेही, त्या व्हिडीओमुळे रंगली सोशल मिडीयावर चर्चा title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री नोरा फतेही आणि कोरियोग्राफर टेरेन्स यांच्या अफेअरची चर्चा रंगत आहे. टेरेन्स आणि नोरा हे रिलेशनशीपमध्ये असल्याचं बोललं जात. याचदरम्यान दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दोघे  'डान्स मेरी रानी' (Dance Mei Rani) या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे. या व्हिडीओमधील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना देखील आवडत आहे. पण दोघांनी त्यांच्या नात्यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही. 

प्रसिद्ध गायक गुरू रंधावा आणि नोरा फतेही त्यांच नवीन गाणं 'डान्स मेरी रानी'च्या प्रमोशनसाठी अनेक शोमध्ये हजेरी लावत आहेत. अशा परिस्थितीत नोरा आणि गुरु 'इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 2' च्या सेटवर पोहोचले. जिथे नोराने जज टेरेन्स लुईस यांच्यासोबत जबरदस्त डान्स केला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Terence Lewis (@terence_here)

टेरेन्सनेही गाण्याची हुक स्टेप कॉपी करण्याचा प्रयत्न केला. आता टेरेन्स आणि नोरा फतेहीचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नोरा फतेही लवकरच सलमान खानच्या लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस 15' च्या मंचावर तिच्या 'डान्स मेरी रानी' गाण्याच्या प्रमोशनसाठी पोहोचणार आहे. आता सलमान खान आणि बीबी हाऊसचे इतर स्पर्धक नोराच्या हुक स्टेपची कितपत कॉपी करतात हे पाहणे रंजक ठरेल.