T-Series च्या मालकाला Nora Fatehi करते डेट? सोशल मीडिया पोस्टमुळे एकच खळबळ

 Nora Fatehi च्या रिलेशनशिपच्या चर्चांमुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. 

Updated: Nov 19, 2022, 10:17 PM IST
T-Series च्या मालकाला Nora Fatehi करते डेट? सोशल मीडिया पोस्टमुळे एकच खळबळ title=

मुंबई : सोशल मीडिया हे एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथे कधीही काहीही व्हायरल होऊ शकतं. काही मिनिटांतच बातमी आगीसारखी पसरते. दरम्यान, अशात एक मोठी बातमी समोर आली आहे. डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेहीच्या (Nora Fatehi)  खासगी आयुष्यातील ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. सध्या अशा चर्चा सुरु झाल्या आहेत की नोरा ही टी- सीरिजचे मालक भूषण कुमारसोबत  (T-Series Bhushan Kumar) अफेअर आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमुळे सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे.

पाहा ती पोस्ट ज्यामुळे चर्चा सुरु झाली आहे.  

टी-सीरीजचे मालक भूषण कुमार आणि नोरा फतेही हे दोघे रिलेशनशिपमध्ये (nora fatehi dating bhushan kumar) असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. एका नेटकऱ्यांनी ट्वीट करत सांगितले की 'अधिकृतपणे ही बातमी समोर आली  केली आहे की, #NoraFatehi चे Tseries चे मालक #BhushanKumar सोबत गेल्या 2 वर्षांपासून अफेअर आहे आणि हे त्याच्या पत्नीला माहीत आहे. पण तिला या सगळ्यात काहीच अडचण नाही...पैश्याच सर्वस्व आहे. स्वत:ला चित्रपट समीक्षक म्हणवणाऱ्या केआरकेनेही या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे. प्रसिद्ध आणि लोकप्रिय व्यक्तीबद्दल असे बोलणे शोभत नाही असे त्यानं लिहिले आहे. (bhushan kumar's wife reaction on nora fatehi and her husbands affair)

पाहा नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट्स 

हेही वाचा : ज्या चित्रपटानं Famous केलं त्याच Hera Pheri विषयी सुनील शेट्टी 'असं' का म्हणाला?

यावर नेटकऱ्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एका नेटकरी म्हणाला, 'कोणी दुजोरा दिला... नोरा की भूषण.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'सोशल मीडियावर लोक काहीही बोलून निघून जातात.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'टी-सीरीजच्या लोकांनी यासाठी कोणती पत्रकार परिषद घ्यावी का... अशा खोट्या बातम्या पसरवू नका..., अशा अनेक कमेंट्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.