नोराचा 'बस इट चॅलेंज' व्हिडीओ इंटरनेटवर धमाका, एका दिवसात 11 मिलियन्स Views

अभिनेत्री आणि अफलातून डान्सींग क्वीन नोरा फतेहीने (Nora Fatehi) नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केलेला आहे.

Updated: Apr 8, 2021, 09:03 PM IST
नोराचा 'बस इट चॅलेंज' व्हिडीओ इंटरनेटवर धमाका, एका दिवसात 11 मिलियन्स Views title=

मुंबई : अभिनेत्री आणि अफलातून डान्सींग क्वीन नोरा फतेहीने (Nora Fatehi) नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केलेला आहे. तिने सध्या ट्रेन्डींग असलेल्या 'बस इट डाउन' या व्हिडीओवर डान्स केला आहे आणि हा व्हिडीओ अफाट व्हायरल होत आहे. नोराने ज्याप्रकारे हे 'बस इट डाउन चॅलेंज' प्ले केला आहे, तिचे लाखो चाहते या व्हिडीओवर फिदा झाले आहेत. तिच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेन्ट्सचा वर्षाव केला आहे. नोराच्या या व्हिडीओला केवळ एका दिवसात 11 मिलियन्सहून अधिक व्हीव्स मिळाले आहेत.

जर आपण बॉलिवूडमधील एका सामान्य गाण्याबद्दल विचार केला तर, एकाच दिवसात इतके व्हीव्स कधीच मिळत नाहीत. पण नोराने तिच्या सौंदर्याच्या जादूने भारतालाच काय, तर संपूर्ण जगाला भूरळ पाडली आहे.  यामुळेच नोराने पोस्ट केलेल्या प्रत्येक व्हिडीओ आणि फोटोंना खूप लाईक्स आणि कमेन्ट्स येतात. त्याला अनेकांकडून शेअर देखील केले जाते, ज्यामुळे ते पटकन सोशल मीडियावर व्हायरल होतात.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

नोरा सध्या बॉलिवूडची सर्वात मोठ्या आणि नामवंत डान्सरपैकी एक आहे. तिची पॉप्युल्यारिटि केवळ भारतातच नाही तर साता समुद्रा पार देखील आहे. नोराचा हा सिल्व्हर मेटॅ्यालिक ड्रेस इंटरनॅशनल डिझायनर 'जियानिना आजार'ने डिझाइन केलेला आहे. आता नोराच्या या किलर डान्स 'बस इट डाउन' चॅलेंज ला कोण स्वीकारेल हे पाहाने औत्सुक्याचे ठरेल.