Bigg Boss 11 : हीना खानने घराबाहेर पडताच केला 'हा' खोटा दावा

बिग बॉसच्या 11 व्या पर्वामध्ये खरी टक्कर हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय 'बहू' आणि  ' भाभीजी' यांच्यामध्ये रंगली.

Updated: Jan 17, 2018, 08:13 AM IST
Bigg Boss 11 :  हीना खानने घराबाहेर पडताच केला 'हा' खोटा दावा   title=

मुंबई : बिग बॉसच्या 11 व्या पर्वामध्ये खरी टक्कर हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय 'बहू' आणि  ' भाभीजी' यांच्यामध्ये रंगली.

अंतिम चार स्पर्धकांमाध्ये अखेरची लढत हीना खान आणि शिल्पा शिंदेमध्ये रंगली. मात्र घरात आणि घराबाहेरही लोकप्रिय असलेल्या शिल्पा शिंदेन बिग बॉसचे अंतिम  पर्व जिंकले आहे. 

पुन्हा खोटं बोलली हीना खान    

हीना खान आणि शिल्पामध्ये अनेकदा शाब्दिक चकमकी उडाल्या होत्या. घराबाहेर पडल्यानंतर हीना खानने आपण अल्पशा मतांच्या फरकाने दुसर्‍या क्रमांकावर आहोत अशी माहिती दिली होती.  
सलमान खान आणि हीनामध्ये अवघ्या काही हजारांच्या मतांचा फरक असल्याचे सलमानने सांगितले आहे. असे हीना मीडियासमोर म्हणाली. मात्र हीनाचा हा दावा खोटा असल्याचा समजल्यानंतर हीना सोशलमीडियावर ट्रोल झाली आहे.  

ट्विटरवर ट्रोल 

काही ट्विटर हॅन्डलवर हीनाचा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. हीना आणि शिल्पामध्ये केवळ हजाराचा नव्हे तर 70 लाख मतांचा फरक असल्याचे म्हटले आहे.  

केआरके बॉक्स ऑफिसची माहिती 

 

केआरके बॉक्स ऑफिसच्या ऑफिशिएअल ट्विटर अकाऊंटने दिलेल्या माहितीनुसार शिल्पा शिंदेला हीनापेक्षा तब्बल 70 लाख अधिक मतं मिळाली होती. शिल्पाला चाहत्यांचा पाठिंबा होता. त्यामुळेच  ती अनेकदा नॉमिनेशनमधून बचावली होती.