Katrina नव्हे, विकीच्या मिठीत असणाऱ्या 'या' अभिनेत्रीनं वळवल्या नजरा, पाहणारेही थक्क

बॉलीवूडमध्ये सेलिब्रेटींची सर्वात जास्त चंगळ पाहायला मिळते ती पार्टीमध्ये. मग ती चित्रपटाची सक्सेस पार्टी असो वा अन्य सेलिब्रेटींचे पार्टी फंग्शन. पार्टी हा एकमेकांसमोर येण्याचं मोठं माध्यम असतं. 

Updated: Oct 20, 2022, 09:08 PM IST
Katrina नव्हे, विकीच्या मिठीत असणाऱ्या 'या' अभिनेत्रीनं वळवल्या नजरा, पाहणारेही थक्क title=

Vicky Kaushal and Shehnaaz Gill: विकी कौशल आणि कतरिना कैफच्या (Vicky Kaushal and Katrina Kaif Wedding) लग्नाला आता म्हणता म्हणता एक वर्षे पुर्ण होणार आहे. कतरिना आणि विकी कौशल आपले एकत्र काढलेले फोटोही सोशल मीडियावर शेअर करतात. त्यांच्या या फोटोंवर त्यांचे चाहतेही कायम फिदा असतात. विकी कौशलचेही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. परंतु सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोनं सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. 

चित्रपट निर्माते रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीत नुकतीच बॉलीवूडच्या अनेक तारे तारकांनी हजेरी लावली होती. विकी कौशल-कतरिना (Diwali Party 2022) कैफ आणि रितेश देशमुख-जेनेलिया डिसूझापासून शिल्पा शेट्टी आणि तापसी पन्नूपर्यंत, सेलिब्रिटींनी या संध्याकाळी हजेरी लावली होती. गायिका आणि पंजाबी अभिनेत्री शहनाज गिललाही (Shehnaaz Gill Diwali Party) पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. 

आणखी वाचा - गव्हापासून नाही तर चण्याच्या डाळीच्या पोळ्या ठरतील आरोग्यदायी... पाहा फायदे

 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

समोर आलेल्या फोटोमध्ये शेहेनाज आणि विकी एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. त्यामुळे या फोटोवरून सगळीकडे एकच हल्लाबोल सुरू आहे. हे फोटो शेहेनाजने पोस्ट केले आहेत. या फोटोवर चाहत्यांनी हार्ट इमोजीचं पोस्ट केलं आहेत. हा फोटो सध्या सगळीकडे व्हायरल होतो आहे आणि या फोटोमुळे कतरिनाव्यतिरिक्त (Vicky Kaushal Katrina Kaif Video) विकीनं कोणाला मिठीत घेतले आहे यानं एकच खळबळ उडाली आहे. 

आणखी वाचा - Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; 'एअरपोर्टवर...'

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांची बॉलीवूडच्या दिवाळी पार्टीत जोडी म्हणून पहिलीच उपस्थिती होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्न झालेल्या या दोघांनी रमेश तौरानीच्या गाला नाईटमध्ये हजेरी लावली होती. सध्या सगळीकडेच विकी कौशल आणि कतरिना सार्वजनिक सोहळ्यांना उपस्थिती दाखवत आहेत. नुकतीच त्यांनी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यालाही उपस्थिती दर्शवली होती. पार्टीत सहभागी झालेले इतर सेलिब्रिटींनी यावेळी दिवाली पार्टी एन्जॉय केली.  रकुल प्रीत सिंग आणि बॉयफ्रेंड जॅकी भगनानी, पुलकित सम्राट आणि गर्लफ्रेंड क्रिती खरबंदा, नोरा फतेही, नुश्रत भरुच्चा, हुमा कुरेशी, चित्रांगदा सिंग आणि कार्तिक आर्यन (Kartik Aryan). रमेश तौरानी यांच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 

विकी कौशल पुढे मेघना गुलजारच्या सॅम बहादूरमध्ये दिसणार आहे. दुसरीकडे, शहनाज गिलकजे किसी का भाई किसी की जान आणि किक 2 (Kick 2) असे चित्रपट आहेत.