ऐश्वर्याच्या तालावर नाचते अजय देवगन- काजोलची लेक; Video Viral 

काजोल आणि अजय देवगनची मुली न्यासा देवगन सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते

Updated: Apr 6, 2022, 04:25 PM IST
ऐश्वर्याच्या तालावर नाचते अजय देवगन- काजोलची लेक; Video Viral  title=

मुंबई : काजोल आणि अजय देवगनची मुली न्यासा देवगन सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. न्यासाचा नवीन व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल होतो. काजल आणि अजय देवगणची मुलगी असल्याने न्यासाविषयी जाणून घेण्यासाठी लोकं भरपूर एक्साईटेड असतात. अशाच प्रकारे न्यासाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती तिच्या स्कूलमध्ये डान्स परफॉर्मन्स देताना दिसत आहे. या व्हिडिओत ती तिच्या फ्रेंड्ससोबत डान्स करताना दिसत आहे. 

न्यासा देवनचे काही डान्स व्हिडिओला त्यांच्या फॅन्सपेजवर शेअर करण्यात आलं आहे. या व्हिडिओला लोकं खूप पसंत करत आहेत. एका व्हिडिओमध्ये न्यासा ऐश्वर्या रायच्या 'कजरा रे' या प्रसिद्ध गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती आई काजोलच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

शाळेच्या फंक्शनमधला व्हायरल झालेल्या न्यासाच्या या व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्सही प्रेम व्यक्त करत आहेत. व्हिडिओमध्ये न्यासा ज्या प्रकारे डान्स करत आहे ते पाहता लोकं तिला बॉलिवूडची पुढची सुपरस्टार म्हणत आहेत हे पाहून लोकं आश्चर्यचकित होत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एका चाहत्याने न्यासाच्या या व्हिडिओवर कमेंट करत लिहीलं आहे की, 'ही तर फक्त सुरुवात आहे सिंघमची मुलगी खुप पुढे जाणार'. तर अजून एका युजर्सने कमेंट करत लिहीलंय की, 'आमची टॅलेंटेड गर्ल.' न्यासा देवगणने बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझाईनर मनिष मल्होत्रासाठी रँम्पवॉक केला होता. यावेळी ती भरपूर स्टाईलिश आऊटफिटमध्ये दिसत होती. ज्याचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते..