'ओंकार अन् माझ्यात इतकं साम्य की...' समीर चौगुलेनं सांगितलं काय आहे नातं!

खंरतर ओंकार आज आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करतोय. आणि त्याच्या वाढदिवसानिमीत्त अनेक सेलिब्रिटी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. नुकतीच समिर चौगुले यांनीही ओंकार साठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. 

सायली कौलगेकर | Updated: Aug 9, 2023, 07:46 PM IST
'ओंकार अन् माझ्यात इतकं साम्य की...' समीर चौगुलेनं सांगितलं काय आहे नातं! title=

मुंबई : हास्यजत्रा हा प्रेक्षकांचा आवडता शो आहे. या शोमधील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या अवघ्या काही वेळातच घर करुन गेलेत. आता पुन्हा एकदा लवकरच हास्यजत्रा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच याची घोषणाही करण्यात आलीये. नुकताच ओंकारसाठी समिर चौगुले यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. व्हायरल होणारी ही पोस्ट नेमकी काय आहे. याबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

खंरतर ओंकार आज आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करतोय. आणि त्याच्या वाढदिवसानिमीत्त अनेक सेलिब्रिटी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. नुकतीच समिर चौगुले यांनीही ओंकार साठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये समिर आणि ओंकारचा एक सेल्फी आहे. हा फोटो शेअर करत समिर यांनी कॅप्शनमध्ये लिहीलंय की, ''ओंकार राऊत वाढदिवसाच्या फुल्टू शुभेच्छा......गेल्या वर्षी तुझ्या वाढदिवसा निमित्ताने काही कारणास्तव पोस्ट टाकली नाही...

तुला कारण माहितीय...पण या वर्षी मी ही संधी गमावणार नाही.......ओंकार, ओंकी , राजदीप, ओम ..साधारणतः दोन वर्षांपूर्वी आमच्या हास्यजत्रेत सहभागी झालेला रंगकर्मी..रुपारेल महाविद्यालयात एकांकिका क्षेत्रातील मोठं नाव, नाटकावर मनापासून प्रेम करणारा असल्याने एखाद दोन प्रहसनातच तो हास्य जत्रेत रुळला..कारण आमच्या ओंक्याची grasping करण्याची क्षमता अफाट आहे.....आणि सगळ्यात महत्वाचं "शिकण्याची आणि इतरांनी केलेल्या सूचना, लक्षात आणून दिलेल्या चुका प्रांजळपणे स्वीकारण्याची वृत्ती आहे...प्रत्येक skit नंतर पाटी कोरी करून गोस्वामी सरांसमोर नव्याने धडे गिरवायला बसण्याची वृत्तीच तुला अजून मोठं करणार ओंकार ... 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ओंकारचं आणि माझं खास नातं आहे...understanding आहे...मला स्वतःला ॲक्शन फिल्म्स खूप आवडतात...हॉलिवूडची प्रत्येक अँक्शन फिल्म आम्ही एकत्र बघतो....क्रिकेट आमच्या दोघांचाही श्वास आहे..arjit singh चं "खैरियत पूछो"हे गाणं आम्हा दोघांना ही प्रचंड आवडत.....आमच्या राऊतला "कंटाळा" आणि "आता कशाला?" हे शब्द खूप आवडतात...वर वर अत्यंत बेपर्वा आणि cool वाटणारा ओंकार..स्वतःच्या कामा बद्धल अत्यंत सिरियस आहे...एखाद skit पडल्यावर स्वतःवरच चिडणारा ओंकार मी जवळून बघितलाय....वरकरणी अत्यंत कोरडा वाटणारा आमचा मनोमिलन स्वरछेडे आतून खूप हळवा आहे...अश्या या मित्रास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा....'' सध्या ही पोस्ट चाहत्यांचं लक्ष वेधत आहे. आणि ओंकारवर त्याचे चाहते आणि सेलिब्रिटी शुभेच्छांचा वर्षाव करत आहे