Oscar 2023 : महिलांनी भारताची मान उंचावली; PM Modi आणि राहुल गांधी यांनी दिल्या ऑस्कर पुरस्कार विजेत्यांना खास शुभेच्छा

Oscar 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत The Elephant whisperers आणि Natu Natu च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. भारताला तीन कॅटेगरीमध्ये नॉमिनेशन मिळालं असताना दोन कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाला आहे. 

Updated: Mar 13, 2023, 01:30 PM IST
Oscar 2023 : महिलांनी भारताची मान उंचावली; PM Modi आणि राहुल गांधी यांनी दिल्या ऑस्कर पुरस्कार विजेत्यांना खास शुभेच्छा title=

Oscar 2023 The Elephant Wispers and Natu Natu : ऑस्कर 2023 मध्ये भारतानंच एक खास छाप सोडली आहे. तीन कॅटेगरीत नॉमिनेशन मिळाल्यानंतर दोन कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळावल्यानंतर भारताचं नावं केलं आहे. 'द एलिफेंट विस्पर्स' (The Elephant whisperers ) या माहितीपटाला बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्ममध्ये पुरस्कार मिळाला आहे. RRR या चित्रपटातील 'नाटू नाटू' (Natu Natu) गाण्याला ओरिजनल सॉंग या कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाला. या कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळवल्यानंतर म्यूजिक कम्पोजर एमएम कीरावानी यांनी सगळ्यांना भारतीयांना गर्व होईल असं काम केलं आहे. 'नाटू नाटू' आणि 'द एलिफेंट विस्पर्स' याला पुरस्कार मिळाल्यानंतर फक्त नेटकरीच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

'द एलिफेंट विस्पर्स' या चित्रपटाला शुभेच्छा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की 'गुणीत मोंगा आणि ‘The Elephant Whisperers’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमला या सन्मानासाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांनी केलेल्या कामानं शाश्वत विकास आणि निसर्गाचा समतोल राखण्याचे महत्त्व उत्तम पद्धतीनं दाखवले आहे.' 

राहुल गांधी यांनी या चित्रपटाविषयी कमेंट करत 'कार्तिकी गोन्सालव्हीस आणि गुणीत मोंगा आणि 'द एलिफेंट विस्पर्स' च्या संपूर्ण टीमला ऑस्कर पुरस्कार मिळाल्या बाबतमीत खूप खूप शुभेच्छा! या दोन महिलांनी इतक्या सुंदर पद्धतीनं जंगल आणि जंगलात राहणाऱ्या प्राण्यांचे महत्त्व दाखवतं भारताची मान उंचावली.' 

नाटू नाटू गाण्याची टीमलाही दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत त्यांनी संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 'अपवादात्मक… ‘नाटू नाटू’ गाण्याची लोकप्रियता साऱ्या जगभरात पसरली आहे. हे गाणं पुढील कित्येक वर्षं लोकांच्या स्मरणात राहील. एमएम कीरावानी आणि चंद्रबोस या दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि हा सन्मान मिळवण्यासाठी संपूर्ण टीमचे अभिनंदन. भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.'

हेही वाचा : Oscars 2023 : आई, मी ऑस्कर जिंकलो; पुरस्कार सोहळ्यातील अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

दुसरीकडे कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष यांनी या टीमला शुभेच्छा देत म्हटले की 'भारताचं हे गाणं आणि डान्स खरंच ग्लोबली व्हायरल झाला आहे. खूप शुभेच्छा आणि RRR च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा!'