अभिनेता कादर खान यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

सरफराजच्या मते त्याच्या वडीलांना पद्मश्री पुरस्कार फार उशीराने मिळाला. 

Updated: Jan 29, 2019, 11:21 AM IST
अभिनेता कादर खान यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर title=

मुंबई: बॉलिवूडचे जेष्ठ कलाकार कादर खान हे वयाच्या 81 व्या वर्षी काळाच्या पडद्या आड गेले. कॉनडाच्या एका रुग्णालयात त्यांनी आखेरचा श्वास घेतला. कलाविश्वात आपल्या अभिनयाने एक काळ गाजवणाऱ्या या कलाकारास भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देण्याचे जाहीर केले आहे. कादर खान यांनी त्यांच्या कारकिर्दीत 300 पेक्षा जास्त सिनेमात काम केले. पण त्यांना हा सन्मान स्वत:च्या हातांनी स्वीकारता येणार नसल्याची खंत त्यांच्या मुलाला वाटत आहे. 31 डिसेंबर रोजी दीर्घ आजारामुळे त्यांचे निधन झाले. हिंदी सिने जगतात त्यांचे मोलाचे योगदान होते.

एका मुलाखतीत सरफराजने सांगितले, 'खूप चांगली गोष्ट असती जर माझे वडील हा पुरस्कार स्वकारण्यासाठी हयात असते. देवाला फक्त चांगली माणसे आवडतात आणि तो त्यांना बोलावण्यासाठी कोणता तरी मार्ग काढतो.' सरफराजच्या मते त्याच्या वडीलांना पद्मश्री पुरस्कार फार उशीराने मिळाला. 

वडिलांच्या मृत्यूनंतर सरफराजने बॉलिवूड मंडळींवर निराशा व्यक्त केली. त्याने बॉलिवूड मंडळी क्रूर असल्याचे सांगितले. कॉनडाला गेल्यानंतर बॉलिवूड मंडळींनी कादर खान यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या एकाही मित्राने त्यांना एक फोन सुद्धा केला नाही. असे वक्तव्य अभिनेता कादर खान यांचा मुलगा सरफराज याने केला. त्याचप्रमाणे त्याने अभिनेता गोवींदाला चांगलेच खडेबोल सुनावले.

 

उत्कृष्ट कलाकार कादर खान यांनी १९७३ साली 'दाग' सिनेमाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केले. कादर खान यांनी आपल्या कारकीर्दीत ३०० हून अधिक सिनेमात काम केले. इतकंच नाही तर त्यांनी २५० हून अधिक सिनेमांसाठी संवाद लिहिले आहेत. कादर खान आणि गोवींदा या जोडीने चाहत्यांच्या मनावर आपले आधिराज्य गाजवले. 'दरिया दिल' , 'राजा बाबू' , 'कुली नंबर 1' , 'छोटे सरकार', 'आंखें' ,'तेरी पायल मेरे गीत', 'आंटी नंबर 1' , 'हीरो नंबर 1' , 'राजाजी' , 'नसीब' , 'दीवाना मैं दीवाना' , 'दूल्हे राजा' , 'अखियों से गोली मारे' अनेक सिनेमांच्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांचे मनोरंजन केले.