बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी हृतिकची बहीण सज्ज

 बॉलीवूड इंडस्ट्रीत पदार्पण करणारी नवीन आणि तरुण स्टारकिड पश्मिना रोशन लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.

Updated: Jul 22, 2022, 09:13 PM IST
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी हृतिकची बहीण सज्ज title=

मुंबई : बॉलीवूड इंडस्ट्रीत पदार्पण करणारी नवीन आणि तरुण स्टारकिड पश्मिना रोशन लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. खरंतर, वृत्तानुसार रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये तिने आठपेक्षा जास्त वेळा हाऊसफुल शो सादर केले आहेत. पश्मिना रोशनने वयाच्या 21 व्या वर्षी ऑस्कर वाइल्ड कॉमेडी नाटक 'इम्पॉर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट' मध्ये सेसिली कार्ड्यू म्हणून रंगभूमीवर पदार्पण केलं.

अशाप्रकारे प्लॅटफॉर्मवर एक अभिनेत्री म्हणून ठसा उमटवल्यानंतर, पश्मिना रोशन आता 2003 च्या क्लासिक रोमँटिक चित्रपट इश्क विश्कच्या बहुप्रतिक्षित रीबूटसह  शोबिझमध्ये प्रवेश करत आहे. मॉडर्न रिलेशनशिपला एक समकालीन वळण देत, इश्क विश्क रिबाउंडमध्ये पश्मिना रोशन लेटेस्ट नॅशनल सेंसेशन रोहित सराफ, कभी खुशी कभी गम फेम जिब्रान खान आणि नाइला ग्रेवाल यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

टीमने नुकतंच देहरादूनमध्ये त्याचं शुटींग पूर्ण केलं आणि शूटच्या काही मजेदार झलकही शेअर केल्या. ज्यामुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्साह वाढला आहे. तत्पूर्वी, निर्मात्यांनी रीबूटची घोषणा करत चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज केलं आणि कलाकारांचा पहिला लूकही सादर केला. त्यामुळे, पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. पश्मिना रोशनचा डेब्यू चित्रपट हा पुढच्या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे.