पूजा भट्टला वडील महेश यांनी असं काय सांगितलं की, ती संजय दत्तसोबत किसिंग सीनला घाबरली नाही

पूजा भट्ट म्हणाली की,  किसिंन सीन देण्यापूर्वी खूप टेंन्शन आलं होतं

Updated: Apr 30, 2021, 04:44 PM IST
पूजा भट्टला वडील महेश यांनी असं काय सांगितलं की, ती संजय दत्तसोबत किसिंग सीनला घाबरली नाही title=

मुंबई : अभिनेत्री आणि दिग्दर्शिका पूजा भट्ट पुन्हा एकदा नेटफ्लिक्सच्या माध्यमातून बॉम्बे बेगम या सिनेमातून अभिनय क्षेत्रात एन्ट्री करणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान पूजा भट्टने बरेच किस्से शेअर केले. पूजा भट्टने तिचे वडील महेश भट्ट यांनी तिला सड़क चित्रपटात संजय दत्तसोबत किसींग सीन करण्यापूर्वी तिला काय सल्ला दिला होता ते सांगितलं.

एका मुलाखतीमध्ये बोलताना पूजा भट्ट म्हणाली की, सीनपूर्वी किसिंन सीन देणं खूप टेंन्शन आलं होतं. पुढे म्हणाली, 'त्यावेळी मी 17-18 वर्षांची होती. ज्याचं पोस्टर मी माझ्या रुममध्ये लावलं होतं, त्याच व्यक्तीला मला किस करायचं होतं. पूजा भट्ट पुढे म्हणाली, 'सडक'च्या सेटवर मी खूप मासूम होते. लहान होते. 1991 मध्ये मी पहिला किस केला. या चित्रपटात मी माझा आयकॉन संजय दत्तला किस केलं.

'मला आठवतं की बाबांनी मला आयुष्यभरासाठी एक गोष्ट त्यावेळी शिकवली. सीन शूट होण्याआधी मला माझ्या बाबंनी बाजूला घेवून गेले. आणि म्हणाले की, तुला आता जर यात अश्लील वाटत असेल तर तू ते अश्लीलच म्हणून घेशील. पूजा भट्ट पुढे म्हणाली  'माझ्या वडिलांनी मला किसींन किंवा लव्हसीनला ''मासूमियत, ''ग्रेस'' आणि डिग्निटी''सोबत केलं पाहिजे. कारण सीनला कम्युनिकेट होण फार गरजेचं आहे'

19 वर्षानंतर कमबॅक
या चित्रपटाच्या माध्यमातून पूजा भट्ट १९ वर्षांनंतर कमबॅक करत आहे. पूजा 'एवरीबॉडी सेज आई एम फाइन' या चित्रपटात दिसली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल बोस यांनी केलं होतं. पूजा भट्ट राहुल बोससोबत बॉम्बे बेगममध्ये दिसणार आहे. या चित्रपटात पूजाशिवाय अमृता सुभाष, सहाना गोस्वामी यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अलंकृता श्रीवास्तव यांनी केलं आहे.