घटस्फोटानंतर पुन्हा विवाहबंधनात अडकण्यासाठी अभिनेत्री सज्ज

टेलिव्हिजन अभिनेत्यासोबतचं तिचं नातं फार काळ टिकलं नव्हतं. 

Updated: Jun 2, 2019, 08:31 AM IST
घटस्फोटानंतर पुन्हा विवाहबंधनात अडकण्यासाठी अभिनेत्री सज्ज title=

मुंबई : कलाविश्वात सेलिब्रिटींच्या नात्यांची गुंतागुंत आणि त्यात येणारं वादळ हे कधीच लपून राहिलेलं नाही. इथे नाती अगदी क्षणार्धात आकारास येतात, त्यातील बरीचशी आयुष्यभरासाठी टीकतात तर काही मात्र या वाटेच मध्ये कोमेजून जातात. नात्यांच्या या प्रवासात भरकटलेल्या किंवा अपयशी ठरलेल्या नात्यांना अनेकदा दुसरी संधीही दिली जाते.

आपल्या खासगी आयुष्याला अशीच दुसरी संधी देण्यासाठी सध्या एक टेलिव्हिजन अभिनेत्री सज्ज झाली आहे. विविध मालिकांतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी ती अभिनेत्री आहे, दलजीत कौर. 

टेलिव्हिजन विश्वातूनच प्रसिद्धीझोतात आलेल्या शालिन भनोट याच्यासोबत दलजीतने २००९ मध्ये लग्नगाठ बांधली होती. पण, त्यांचं हे नातं फार काळ टीकलं नाही. २०१५ मध्ये त्यांच्या नात्यात दुरावा आला. परिणामी घटस्फोट घेत त्यांनी वेगळ्या वाटा निवडल्या. आपल्या याच खासगी आयुष्याविषयी एक महत्त्वाचा उलगडा दलजीतने 'बॉम्बे टाईम्स'ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला. 

''मी आता लग्न करण्य़ासाठी सज्ज आहे आणि ते लवकरच होईलही. माझे पालक माझ्यासाठी सध्या 'मिस्टर राईट'च्या शोधात आहेत. मी स्वत:सुद्धा काही मुलांना भेटत आहे. पण, हे सारंकाही सध्या जरा वेगळं आहे. कारण, माझ्यावर एक जबाबदारी आहे'', असं दलजीत म्हणाली. दलजीतला एक मुलगा आहे. त्यामुळे पुन्हा लग्न करतेवेळी आपण सर्वप्रथम एक आई आहोत हे ती विसरलेली नाही. कोणा एकाची पत्नी होण्यापूर्वी मातृत्वाच्या जबाबदारीला ती प्राधान्य देत आहे. 

Post-divorce with Shaleen Bhanot, 'Qayamat Ki Raat' fame Dalljiet Kaur is looking to embrace marital bliss again

पुन्हा एकदा अभिनेत्याशीच लग्न्गाठ बांधणार का?, असा प्रश्न विचारला असता जो व्यक्ती आपल्या आयुष्यात येईल तो या कलाविश्वातील नसेल असं तिने स्पष्ट केलं. 'सध्याच्या घडीला मला काही चांगली स्थळं येत आहेत, किंबहुना काही अभिनेत्यांकडूनही मला विवाहप्रस्ताव आले. पण, तो येणारा हा या कलाविश्वातील नसेल. कारण, आता मला आयुष्यात स्थैर्य हवं आहे. त्यामुळे एखादा व्य़ावसायिक किंवा बऱ्याच अंशी स्थिर असणाऱ्या व्यक्तीलाच मी प्राधान्य देईन. मी एका चांगल्या कुटुंबाच्या प्रतिक्षेत आहे, जे आदरपूर्वक वागणूक देऊ शकेल. आता मला प्रयोगशीलतेकडे झुकायचं नाही, कारण ते वयंही नाही', असा प्रगल्भ विचार तिने मांडला.

शालिन आणि आपल्या मुलाच्या नात्याविषयी सांगताना दवलजीतने शालिनच्या आदरपूर्वक आणि सौजन्यशील स्वभावाचं कौतुक केलं. पण, आपल्या मुलाला सालिनशी फारशी जवळीक नसल्याचंही तिने स्पष्ट केलं. 'माझा मुलगा त्याचे मित्र आणि त्यांच्या वडिलांसोबतचं त्यांचं नातं याविषयी अनेकदा बोलत असतो. तो या नात्यातील वेगळेपण, ती साथ या साऱ्यापासून दूर आहे. त्यामुळे तोसुद्धा आता वडिलांच्या एका सुरेख नात्यासाठी तयार आहे असं मला वाटतं' हे दलजीतने सांगितलं. त्यामुळे आता खासगी आयुष्यात आलेल्या वादळांवर मात करत पुढे निघालेल्या दलजीतला या प्रवासाथ तिच्या 'मिस्टर राईट'ची साथ कधी मिळणार हे  पाहणं अतिशय औत्सुक्याचं ठरणार आहे.