Prajakta Mali च्या आयुष्यातील फरहान नक्की आहे तरी कोण? Photo व्हायरल

'रानबाजार'नंतर फरहान नावाच्या व्यक्तीमुळे प्राजक्ता चर्चेत, लंडनमधील 'तो' Photo आणि...   

Updated: Sep 27, 2022, 09:13 AM IST
Prajakta Mali च्या आयुष्यातील फरहान नक्की आहे तरी कोण? Photo व्हायरल  title=

मुंबई : 'चंद्रमुखी', 'हंपी', 'पांडू', 'रानबाजार' अशा अनेक एकापेक्षा एक सिनेमांमध्ये झळकलेली अभिनेत्री प्राजक्त माळी (Prajakta Mali) कायम आपल्या अभिनयाने चाहत्यांना घायाळ करत असते. फक्त अभिनयामुळेच नाही तर, सौंदर्यामुळे देखील अभिनेत्री चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रिय असणारी प्राजक्ता तिच्या जीवनातील रोजच्या घडामोडी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या प्राजक्ता लंडनमध्ये सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.  (prajakta mali husband name)

पण शुटिंग संपल्यानंतर प्राजक्ता लंडन फिरत आहे. या भटकंतींचे फोटो प्राजक्ता चाहत्यांसोबत शेअर करत आहे. पण लंडनमध्ये अभिनेत्रीचे सुंदर फोटो काढणारा हा व्यक्ती कोण असेल? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. (prajakta mali contact number) 

तर प्राजक्ताचे फोटो काढणारा व्यक्ती अभिनेत्रीचा ज्युनियर फरहान आहे. फोटो पोस्ट करत प्राजक्ताने फरहानला टॅग केलं आहे. सध्या प्राजक्ताचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिनेत्री प्राजक्ता माळी सतत आपल्या कामामुळे आणि लूक्समुळे चर्चेत असते. आजही अभिनेत्रीने (prajakta mali social media) आपले हटके फोटो शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. (prajakta mali instagram)

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन प्राजक्ता चर्चेत येण्याची कोणतीही संधी मागे सोडत नाही. आपल्या जबरदस्त अभिनयाने चाहत्यांना घायाळ करणारी प्राजक्ता माळीने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करुन खळबळ माजवली आहे.