निक नव्हे, कोणा दुसऱ्यासोबत प्रियांकाचं Night Out; प्रायव्हेट फोटो व्हायरल

प्रियांकाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Updated: Jul 29, 2022, 01:01 PM IST
निक नव्हे, कोणा दुसऱ्यासोबत प्रियांकाचं Night Out; प्रायव्हेट फोटो व्हायरल  title=

मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांकाचं लग्न अमेरिकन सिंगर निक जोनसशी झालं आहे. प्रियांका निकसोबत बऱ्याचवेळा फिरायला जाते. ती सोशल मीडियावर निकसोबतचे अनेक फोटो शेअर करताना दिसते. प्रियांका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच प्रियांकाने सोशल मीडियावर तिचे नाईट आऊटचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. दरम्यान, प्रियांका यावेळी निकसोबत नाही तर दुसऱ्या एका कलाकारासोबत असल्यामुळे चर्चेत आहे. 

प्रियांकाने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रियांकासोबत पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ आणि युट्यूबर लिली सिंग दिसत आहेत. हे फोटो दिलजीतचा कॉन्सर्ट संपल्यानंतरचे आहेत. यासोबत प्रियांका आणि लिली सिंगचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ लॉस एंजेलिसमधला आहे. स्टेजवर परफॉम करत असलेल्या दिलजीतला ऑडियन्समध्ये उभ राहून त्याला चीअर करताना दिसत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्रियांका आणि लिली हे विदेशात राहत असले तरी त्यांच्या मनात मायदेशाची आणि तिथल्या लोकांची जागा कोणी घेऊ शकतं नाही हे मात्र खरं आहे. प्रियांकानं अलीकडेच ४०वा वाढदिवस साजरा केला आहे. तिच्या वाढदिवसातील पार्टीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रियांकाच्या वाढदिवसाच्या पार्टीला कुटुंबातील आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती. तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत परिणीती चोप्रानं देखील हजेरी लावली होती. यावेळी प्रियांका आणि निक स्विमिंग पूलमध्ये डान्स करताना दिसले. प्रियांकानं त्या दिवशी पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. यात प्रियांका हॉट दिसत होती. 

प्रियांकाने २०१८ मध्ये निक जोनासशी लग्न केले. त्यांनी जयपूरमध्ये लग्न केले. तर त्याच वर्षी मे महिन्यात ते दोघे रिलेशनशिपमध्ये आले होते. प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी सरोगसीच्या मदतीने मुलीला जन्म दिला. प्रियांका आणि निकने त्यांच्या मुलीचं नाव मालती मेरी चोप्रा जोनस असं ठेवलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्रियांका लवकरच फरहान अख्कर दिग्दर्शित ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कतरिना कैफ आणि आलिया भट्ट देखील असणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांकाचा ‘मॅट्रिक्स ४’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यानंतर प्रियांका ‘टेक्ट फॉर यू’ आणि ‘सिटाडेल’ या वेबसीरिजमध्ये देखील दिसणार आहे.