फक्त या बॉलिवूड अभिनेत्रीला आहे ब्रिटनच्या रॉयल वेडींगचे आमंत्रण!

आज संपूर्ण जगाताचे लक्ष ब्रिटेनच्या शाही विवाहसोहळ्यावर आहे. 

Updated: May 19, 2018, 03:17 PM IST
फक्त या बॉलिवूड अभिनेत्रीला आहे ब्रिटनच्या रॉयल वेडींगचे आमंत्रण! title=

मुंबई : आज संपूर्ण जगाताचे लक्ष ब्रिटेनच्या शाही विवाहसोहळ्यावर आहे. अभिनेत्री मेघन मार्कल ब्रिटनचा प्रिन्स हॅरीसोबत विवाह करणार आहे. पण भारतीयांचे लक्ष मात्र प्रिंस हॅरी आणि मेघन मार्कलच्या रॉयल वेडिंगपेक्षा प्रियंका चोप्राकडे अधिक आहे. या रॉयल वेडींगला उपस्थित राहणारी मिस वर्ल्ड प्रियंका चोप्रा ही एकमेव भारतीय आहे. या ऐतिहासिक विवाहसोहळ्याची ती साक्षीदार होणार आहे. तिला या विवाहसोहळ्याचे आमंत्रण मिळाले असून त्यासाठी लंडनला रवाना झाली आहे. लग्नघरात प्रियंका खूप धमाल करत आहे. तिने इंस्टग्रामवर या धमाल-मस्तीचा फोटोही शेअर केला आहे.

प्रियंकाचा 'बेवॉच'चा फर्स्ट लूक प्रदर्शित

...म्हणून आहे प्रियंकाला आमंत्रण

प्रियंका मेघन मार्कलची मैत्रिण आहे. त्यामुळेच तिला या शाही विवाहसोहळ्याचे निमंत्रण मिळाले आहे. प्रियंका आणि मेघनची पहिली भेट जानेवारी २०१६ मध्ये एली ने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात झाली. या सोहळ्यात टी.व्ही. अभिनेत्री म्हणून प्रियंका सहभागी झाली होती. त्यावेळेस प्रियंका क्वॉन्टिको वर काम करत होती. या भेटीनंतर मेघनने आपल्या लाईफस्टाईल ब्लॉगसाठी प्रियंकाची मुलाखत घेतली. त्यानंत दोघी अनेक ठिकाणी फिरल्या, एकत्र वेळ घालवला, सेल्फी घेतले. दोघींनी हे फोटोज इंस्टाग्रामवरही पोस्ट केले. त्यानंतर मीडियात या दोघींच्या मैत्रीची चर्चा होती.

हा आहे त्यांच्या मैत्रीचा पुरावा

त्यानंतर प्रिंस हॅरी आणि मेघन मार्कलने अधिकृतपणे आपल्या नात्याची घोषणा केली. मग त्या दोघांच्या नात्याबद्दल अनेकांनी प्रियंकाला प्रश्न विचारायला सुरुवात केली. यावरुनच अमेरिकी मीडियात या दोघांच्या मैत्रीची किती चर्चा असेल, हे लक्षात येते. अलिकडेच प्रियंका चोप्राने टाईम्स मॅग्झीनला दिलेल्या मुलाखतीत मेघन मार्कलवर एक भावूक लेख लिहीला. 

Prince meghan markle