अभिनेत्री प्रियांका चोप्राचं धक्कादायक वक्तव्य म्हणाली ''माझी ब्रेस्ट पाहून दिग्दर्शक''...

भारतात आणि जागतिक स्तरावर आपल्या सौंदर्य आणि अभिनयामुळे ओळखली जाणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राला आता कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही.

Updated: Aug 29, 2022, 07:25 PM IST
अभिनेत्री प्रियांका चोप्राचं धक्कादायक वक्तव्य म्हणाली ''माझी ब्रेस्ट पाहून दिग्दर्शक''... title=

मुंबई : भारतात आणि जागतिक स्तरावर आपल्या सौंदर्य आणि अभिनयामुळे ओळखली जाणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राला आता कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. अभिनेत्री प्रियांका चोप्राला इंडस्ट्रीच्या सुरुवातीच्या काळात सांगण्यात आलं होतं की, जर तिला बॉलिवूड अभिनेत्री बनायचं असेल तर तिने तिच्या स्तनाचा आकार वाढवण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागेल. 2000 मध्ये मिस वर्ल्डचा खिताब जिंकणाऱ्या 38 वर्षीय अभिनेत्रीने तिच्या 'अनफिनिश्ड' या बायोग्राफीमध्ये याचा खुलासाही केला आहे.

प्रियांकाने या पुस्तकात असंही म्हटलं आहे की, तिच्या बॉडीमुळे तिला करिअरमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागला आणि सुरू होण्याआधीच सगळं संपतं की काय असं वाटत होतं.

प्रियांकाने आपल्या पुस्तकात लिहीलंय की, तिला भेटलेल्या दिग्दर्शकाने तिचं शरीर मेन्टेन करण्याचा सल्ला दिला होता. हा अनुभव शेअर करत प्रियांकाने बायग्राफीमध्ये लिहीलं आणि आपलं दुख: शेअर केलं

तिने तिच्या पुस्तकात लिहिलं आहे की, ''काही मिनिटांच्या संभाषणानंतर दिग्दर्शकाने मला उभं रहायला सांगितलं आणि नंतर दुसरीकडे वळायला सांगितलं आणि मी ते केलंही आणि नंतर त्याने माझं निरिक्षण केलं. त्याने मला 'बूब जॉब' करावा असा सल्ला दिला. तो म्हणाला की, तुला जर अभिनेत्री व्हायचं असेल तर तुझ्या शरीर मेंटेन असणं आवश्यक आहे. तो असंही म्हणाला की, तो लॉस एंजेलिसमधील एका चांगल्या डॉक्टरला ओळखतो आणि तो मला तिथे पाठवू शकतो.''

अभिनेत्रीने पुढे लिहिलं, ''दिग्दर्शकाच्या ऑफिसमधून बाहेर पडल्यावर मी सुन्न झाले. मी विचार करत होते की, जोपर्यंत मी माझ्या शरीराचे अवयव बदलत नाही तोपर्यंत मी यशस्वी होऊ शकत नाही का? मीडिया आणि इतर लोकं मला डस्की म्हणतात याचाही मी विचार केला आणि मी खूप खचून गेले. मला या इंडस्ट्रीतून बाहेर काढलं जाईल का असं वाटू लागलं. मी त्या  दिग्दर्शकाला तिथून का बाहेर पडले हे कधीच सांगितलं नाही."

तिने पुढे म्हटलंय की, मी कधी माझ्यासाठी उभं राहण्याची हिंम्मत नाही केली. आणि याचा मी स्विकार करते. कारण की मी नेहमी ऐकलंय की, कोणत्याही वादात नका पडू कारण तु इंडस्ट्रीत नवीन आहे. मात्र आता ३५ वर्षानंतर मला समजंल की, मुलींसाठी ही सामन्य बाब आहे आणि त्या नेहमी अशा गोष्टी ऐकत असतात. भलेही मी स्वत:ला कितीही आधुनिक आणि स्मार्ट मुलगी मानने. त्यावेळी मात्र मी खूप घाबरली होती. मी त्या परिस्थितीचा सामना केला होता. जसंकी, पितृसत्ताक उद्योगात काम करणाऱ्या बाकीच्या लोकांप्रमाणेच.''