...म्हणून 'फॅनी खान'मधून आर. माधवन बाहेर !

 ऐश्वर्या राय बच्चन आणि अनिल कपूरच्या फॅनी खान यांच्या आगामी चित्रपटात आर. माधवन दिसणार अशी चर्चा होती. परंतु, काही दिवसांपूर्वीच आर.माधवन ऐवजी राजकुमार राव चित्रपटात वर्णी लावणार असल्याचे कळले. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 12, 2017, 04:45 PM IST
...म्हणून 'फॅनी खान'मधून आर. माधवन बाहेर ! title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई : ऐश्वर्या राय बच्चन आणि अनिल कपूरच्या फॅनी खान यांच्या आगामी चित्रपटात आर. माधवन दिसणार अशी चर्चा होती. परंतु, काही दिवसांपूर्वीच आर.माधवन ऐवजी राजकुमार राव चित्रपटात वर्णी लावणार असल्याचे कळले. 

चित्रपटातील ऐश्वर्याच्या प्रियकराच्या भूमिकेसाठी आर. माधवनला विचारण्यात आले होते. परंतु, माधवांकडे तारखा उपलब्ध नसल्याने तो महत्त्वाच्या भूमिकेला मुकल्याचे म्हटले जात होते. मात्र यामागील कारण काहीतरी वेगळेच असल्याचे समोर आले आहे. बॉलिवूडलाईफच्या वृत्तानुसार, आर. माधवनने खूप मोठ्या रकमेची मागणी केली होती. १५ दिवसांच्या शूटींगसाठी त्याने तब्बल दीड कोटी रुपये मानधन मागितले.  त्यामुळे निर्मात्यांनी त्याला चित्रपटात न घेण्याचा निर्णय घेतला. व त्याच्या जागी राजकुमारला घेण्यात आले. 

फॅनी खानची शूटिंग काही दिवसांपूर्वी सुरु झाली आहे. यात ऐश्वर्या आपल्या पेक्षा वयाने १० वर्ष लहान असलेल्या अभिनेत्यासोबत रोमांस करणार आहे. नुकताच अनिल कपूरचा या चित्रपटातील लूकमध्ये आऊट करण्यात आला होता. तब्बल १७ वर्षानंतर अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.