प्राजक्ता माळीच्या घरी नवी पाहुणी; प्रत्येक ठिकाणी दिसतेय अभिनेत्रीसोबत

हा वेळ तिनं स्वत:साठी काढला म्हणण्यापेक्षा एका खास पाहुणीसाठी काढला. 

Updated: Jun 4, 2022, 08:14 AM IST
प्राजक्ता माळीच्या घरी नवी पाहुणी; प्रत्येक ठिकाणी दिसतेय अभिनेत्रीसोबत  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : raanbazaar 'रानबाजार' या वेब सीरिजमुळं अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं प्रचंड लोकप्रियता मिळवली. प्राजक्तानं सीरिजमध्ये साकारलेली भूमिका पाहता, तिचा हा बोल्ड अंदाज सर्वांनाच भारावणारा ठरला. 

आपल्या वाट्याला आलेली ही भूमिका साकारत तिनं जणू नवी आव्हानं पेलली. प्राजक्तानं सीरिजमध्ये साकारलेल्या बोल्ड दृश्यांची बरीच चर्चाही झाली. 

सततच्या चर्चा, चित्रीकरण आणि व्यग्र वेळापत्रकातून अखेर तिनं स्वत:साठी वेळ काढला. किंबहुना हा वेळ तिनं स्वत:साठी काढला म्हणण्यापेक्षा एका खास पाहुणीसाठी काढला. 

सोशल मीडियावर तिनं या पाहुणीसोबतचे फोटोही पोस्ट केले. या फोटोंमध्ये एक लहानशी मुलगी प्राजक्तासोहत कारमध्ये, हॉटेलमध्ये, घरी, सेटवर अगदी स्विमिंग पूलमध्येही दिसत आहे. (raanbazaar fame Actress prajakta mali shares cute photos with niece)

तुम्हालाही पडला ना प्रश्न, हिच्यासोबत दिसणारी चिमुरडी कोण? या प्रश्नाचं उत्तरही तिनं कॅप्शनमधून दिलं आहे. ही चिमुकली आहे, प्राजक्ताची भाची. 

उन्हाळ्याच्या सुट्टीत पोरं “मामाच्या गावाला” जातात; ही “आत्तूच्या शहरी” आलीए, असं लिहित, प्राजक्तानं तिच्या भाचीची ओळख सर्वांशी करुन दिली. तिनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये आत्या आणि भाचीचं सुरेख नातं पाहायला मिळत आहे. 

प्राजक्तानं तिच्या भाचीसोबतचे फोटो शेअर करताच कमेंट बॉक्समध्ये तिच्या फॉलोअर्सनीही आपआपल्या भाच्यांसोबतच्या आठवणी सांगण्यास सुरुवात केली. भाचीच्या निमित्तानं झालेला हा संवाद कमालच, नाही का?