'काला'मध्ये रजनीकांतबरोबर नाना पाटेकर! पाहा टीझर

रजनीकांत आणि नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेल्या काला या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Mar 2, 2018, 01:48 PM IST
'काला'मध्ये रजनीकांतबरोबर नाना पाटेकर! पाहा टीझर  title=

मुंबई : रजनीकांत आणि नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेल्या काला या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये रजनीकांत हा डॉनच्या भूमिकेत दाखवण्यात आला आहे. टीझरची सुरुवातच नाना पाटेकर यांच्या 'काला, कैसा नाम है रे...' या डायलॉगनं सुरु होतो.

धनुषनं या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. २७ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण त्याआधीच या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. टीझर प्रदर्शित झाल्याबरोबर लगेचच लाखो प्रेक्षकांनी तो यूट्यूबवर पाहिला आहे.

पाहा 'काला'चा टीझर