राखीने रामदेव बाबाला कंडोमवरून दिलं चॅलेन्ज

सतत चर्चेत कसं रहायचं हे राखी सावंतकडू शिकावं. उगाच तिला ड्रामा क्वीन म्हटलं जात नाही. आता पुन्हा एकदा तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी तिने योगगुरू रामदेव बाबा यांना चॅलेन्ज केलं आहे. 

Updated: Dec 26, 2017, 10:51 PM IST
राखीने रामदेव बाबाला कंडोमवरून दिलं चॅलेन्ज title=

मुंबई : सतत चर्चेत कसं रहायचं हे राखी सावंतकडू शिकावं. उगाच तिला ड्रामा क्वीन म्हटलं जात नाही. आता पुन्हा एकदा तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी तिने योगगुरू रामदेव बाबा यांना चॅलेन्ज केलं आहे. 

विराटच्या लग्नाने नाराज

काही दिवसांपूर्वीच विराटने लग्न केल्याने राखी दु:खी झाली होती. इतकेच नाहीतर विराट आणि अनुष्काला कंडोम गिफ्ट करण्याची इच्छाही तिने व्यक्त केली होती.

राखीची कंडोमची जाहीरात

काही दिवसांपूर्वी टीव्हीवर कंडोमच्या जाहीरातींच्या वेळेत बदल करण्यात आल्याने राखीने नाराजी व्यक्त केली होती. लवकरच तिची एक कंडोमची जाहीरात येणार होती, म्हणून असे करण्यात आल्याचा आरोप तिने केला होता. 

रामदेव बाबांना आव्हान

आता राखी सावंतने कंडोमवरून एक विधान केलं आहे. इन्स्टाग्रामवर तिने एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यात तिने रामदेव बाबांना चॅलेन्च दिलं आहे. ‘रामदेव बाबा तुमच्यात दम असेल तर तुम्ही पतंजलीचे कंडोम तयार करा’, असे ती म्हणाली आहे.