Ram Charan Net Worth : करोडोंच घर, महागड्या गाड्या, एअरलाइन कंपनीचा मालक साऊथ स्टार

घर पाहून व्हाल थक्क 

Updated: Jan 14, 2022, 04:35 PM IST
Ram Charan Net Worth : करोडोंच घर, महागड्या गाड्या, एअरलाइन कंपनीचा मालक साऊथ स्टार  title=

मुंबई : Ram Charan Teja Total Income : साऊथ सुपरस्टार राम चरण त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी तसेच त्याच्या लक्झरी लाईफस्टलसाठी ओळखला जातो. राम चरण तेजाचे केवळ दक्षिणेतच नाही तर देशभरात प्रचंड चाहते आहेत. राम चरण, दिग्गज सुपरस्टार चिरंजीवीचा मुलगा. साऊथ चित्रपटांनी सिनेजगतात मोठे नाव कमावले आहे.ते इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहेत.

राम चरण फक्त चित्रपटातून कमाई करत नाही. राम चरण यांची स्वतःची विमान कंपनी देखील आहे. टर्बो मेघा एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड ही हैदराबादमधील एक प्रादेशिक विमान कंपनी आहे. YG ग्राउंड हँडलिंग सेवांमध्ये प्रमुख विमान कंपन्यांना मदत करते. राम चरण हा पोलो क्लबचा मालकही आहे, अभिनेत्याला लहानपणापासूनच घोड्यांबद्दल प्रेम आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राम चरणची मासिक कमाई एका महिन्यात चार कोटींहून अधिक आहे. राम चरण कार कलेक्शनमध्ये अनेक आलिशान गाड्या आहेत. राम चरणकडे Aston Martin, Rolls Royce Phantom, Mercedes GL 350 सारखी अनेक मोठी वाहने आहेत.

साउथ सुपरस्टार राम चरण हाऊसचे हैदराबादच्या जुबली हिल्समध्ये २५ हजार स्क्वेअर फुटांचे आलिशान घर आहे. ज्याची किंमत 30 कोटी आहे. राम चरणचे हैदराबादचे घर एखाद्या राजवाड्यासारखे आहे, त्यात स्विमिंग पूल, जिम आणि टेनिस कोर्ट सर्व सुविधांनी युक्त आहे. तसेच राम चरण यांचेही मुंबईत आलिशान पेंट हाउस आहे. राम चरण मुंबईत सलमान खानचा शेजारी आहे. राम चरण यांनी अनेक प्रकारच्या ब्रँडमध्ये गुंतवणूक केली आहे, ज्यातून त्यांना रॉयल्टी मिळते.