लग्नाच्या तीन दिवसानंतर रणबीर पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद...कसा होता रणबीरचा पोस्टवेडिंग लूक?

लग्नाच्या तीन दिवसानंतर रणबीर कपूर घराबाहेर पडला. पण एवढ्या घाईत रणबीर चाललाय कुठे?

Updated: Apr 17, 2022, 06:14 PM IST
लग्नाच्या तीन दिवसानंतर रणबीर पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद...कसा होता रणबीरचा पोस्टवेडिंग लूक? title=

मुंबईः रणबीर-आलियाच्या लग्नाला तीन दिवस उलटले. तीन दिवसानंतर लगेचच रणबीर पुन्हा आपल्या कामाला लागल्याचं दिसतं आहे. कामानिमित्त एका ऑफिसमध्ये जाताना रणबीर कपूर कॅमेऱ्यात कैद झाला

सध्या सगळीकडे रणबीर-आलियाच्याच लग्नाची चर्चा जोरदार आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच रणबीर घराबाहेर पडल्याचं दिसलं. कॅज्युअल लूकमधला रणबीर कपूर तितकाच भाव खाऊन जातो.

चेक्सचा शर्ट, क्रीम कलर पँट आणि डोक्यावर टोपी अशा पेहरावात रणबीर नेहमीसारखाच हँडसम दिसत आहे. हा लूकही त्याच्या चाहत्यांना चांगलाच पसंतीस पडल्याचं दिसत आहे.

 कारमधून खाली उतरून घाईगडबडीत थेट ऑफिसमध्ये जाताना मीडियाने रणबीरचं अभिनंदनही केलं. त्याला हात हलवत रणबीरने प्रतिसाद दिल्याचं यावेळी व्हिडीओत दिसत आहे. रणबीर तर कामावर पुन्हा हजर झाला आहे त्यामुळे आलियाही लवकरच कामावर परतेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आलिया आणि रणबीरचा शाही विवाह सोहळा 14 एप्रिलला पाली हिलमधील 'वास्तू' या बंगल्यात पार पडला. या विवाह सोहळ्याला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. 

लग्नानंतर हे न्यू कपल सिनेमात कधी एकत्र दिसणार याची त्यांच्या चाहत्यांना प्रतीक्षा आहे. ब्रम्हास्त्र या सिनेमात रणबीर आणि आलिया मुख्य भूमिकेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाची चर्चा आहे. मात्र आता ती प्रतीक्षा संपली आहे. 9 सप्टेंबर 2022 ला ब्रम्हास्त्र सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या सिनेमात ही जोडी एकत्र काम करताना पाहायला मिळणार आहे. मात्र त्यासाठी त्यांच्या चाहत्यांना थोडी वाट पाहावी लागणार आहे