Ranbir Alia Wedding : लग्नानंतर आलियाच्या Ex Boyfriend ची प्रतिक्रिया

बॉलिवूडची क्यूट डॉल आता कपूर कुटुंबाची सून झाली आहे... तिचा एक्स बॉयफ्रेंड म्हणाला...   

Updated: Apr 15, 2022, 09:07 AM IST
Ranbir Alia Wedding : लग्नानंतर आलियाच्या Ex Boyfriend ची प्रतिक्रिया title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये चर्चीत असलेली जोडी म्हणजे अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट... 14 एप्रिल रोजी या  जोडप्याने त्यांच्या नात्याला नवीन नाव दिलं. कुटुंब आणि खास मित्रांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा रंगला.  दोन्ही कुटुंबाने अत्यंत गुपित या विवाह सोहळ्याला ठेवलं. पण लग्न झाल्यानंतर जेव्हा दोघे मीडियासमोर आले.. तेव्हा कोणाच्याचं नजरा दोघांवरून हटत नव्हत्या... 

गुरूवारपासून त्यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अनेकांनी दोघांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. एवढंच नाही तर आलियाचा एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्राने देखील दोघांना शुभेच्छा दिल्या. 

दोघांना शुभेच्छा देत, तो म्हणाला, 'दोघांना शुभेच्छा... तुम्हाला दोघांना प्रेम आणि आनंद...' फक्त आलियाच्या एक्स बॉयफ्रेंडने नाही तर, रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफने देखील दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

ब्रेक अप के बाद... आलिया - सिद्धार्थमध्ये पुन्हा निर्माण होतेय जवळीक?

सध्या आलिया आणि रणबीरचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर लग्न बंधनात अडकले... लग्न झाल्यानंतर मिसेस आणि मिस्टर कपूर जेव्हा सर्वांसमोर आले.. 

तेव्हा दोघांना पाहून फक्त त्यांच्या चाहत्यांचं नाही, तर प्रत्येकाला प्रचंड आनंद झाला... बॉलिवूडची क्यूट डॉल आता कपूर कुटुंबाची सून झाली आहे... आलियाला नवरीच्या रुपात पाहण्याची प्रतीक्षा शिगेला पोहोचली होती... नवरदेवाच्या रुपात रणबीरचा रुबाब देखील मस्तचं होता...