Ranbir Kapoor 'या' सेलिब्रिटींचं तोंडही पाहत नाही, अभिनेत्याच्या शत्रूंची यादी मोठी

इंडस्ट्रीमध्ये रणबीरच्या शत्रूंची संख्या फार मोठी... यादीतलं तिसरं नाव हादरवणारं... तुम्हाला विश्वासही बसणार नाही  

Updated: Apr 13, 2022, 02:15 PM IST
Ranbir Kapoor 'या' सेलिब्रिटींचं तोंडही पाहत नाही,  अभिनेत्याच्या शत्रूंची यादी मोठी title=

मुंबई : इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक सेलिब्रिटींच्या यादीमधील मित्र आपल्याला माहिती असतात. पण या झगमगत्या विश्वात वादाच्या ठिणग्या देखील सुरूच असतात. सेलिब्रिटींची मैत्री तर घट्ट असतेचं.. पण त्यांच्या शत्रूत्वाची चर्चा देखील तुफान रंगलेली असते. आज जाणून घेवू रणबीर कपूरच्या जीवनातील शत्रू. या सेलिब्रिटींचं तोंडही पाहत नाही रणबीर. रणबीरच्या शत्रूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर ज्या सेलिब्रिटीचं नाव आहे. त्यावर तुमचा विश्वास देखील बसणार नाही. 

रणबीर कपूरच्या शत्रूंची यादी
अभिनेता सलमान खान

सलमान आणि रणबीर बद्दल सर्वांना माहिती आहे. सलमान आणि रणबीरमध्ये वाद फक्त आणि फक्त अभिनेत्री कतरिना कैफमुळे आहे. एक वेळ अशी होती, जेव्हा सलमानने रणबीरच्या कानशिलात देखील लगावली. 

दिग्दर्शक अनुराग बासू
'जग्गा जासूस' सिनेमामुळे अनुराग बसू आणि रणबीर कपूर यांच्यात वाद झाला होता. अनुरागने प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर सिनेमा प्रदर्शित केला, त्यामुळे रणबीर कपूर त्याच्यावर चिडला.

अभिनेते ऋषी कपूर 
अभिनेते ऋषी कपूर आणि नितू कपूर यांच्या काही वाद झाले होते. ज्यामुळे रणबीरने वडिलांसोबत अबोला धरला. पण कालांतराने सर्व काही ठिक झाल्याचं समोर आलं.

अभिनेत्री कतरिना कैफ
रणबीर कपूरचे अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत अफेअर होतं. पण कतरिना आणि त्याच्या अफेअरची बरीच चर्चा झाली. मात्र ब्रेकअपनंतर कतरिनाला रणबीरसोबत 'जग्गा जासूस'चं प्रमोशन करायचे नव्हतं. त्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली.

अभिनेता गोविंदा
जग्गा जासूस सिनेमामुळे रणबीरचे अनेकांशी वाद झाले होते. या यादीत गोविंदाच्या नावाचाही समावेश आहे. या सिनेमानंतर गोविंदा आणि रणबीर कपूरच्या नात्यात दुरावा आला. मात्र काही दिवसांनी रणबीरनेही गोविंदाची माफी मागितली.