रणबीर कपूर कोरोना पॉझिटिव्ह...3 दिवसांपूर्वीच आलियासोबत होता शूटला

आई नीतू कपूरने दिली माहिती 

Updated: Mar 9, 2021, 03:36 PM IST
रणबीर कपूर कोरोना पॉझिटिव्ह...3 दिवसांपूर्वीच आलियासोबत होता शूटला  title=

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. रणबीरची आई नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे.

आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय, की रणबीरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्याचे औषधोपचार सुरू आहेत. घरीच रणबीरला क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. कोविड संदर्भातील प्रत्येक काळजी आम्ही घेत आहोत. मिळालेल्या माहितीनुसार रणबीरची तब्येत स्थिर आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54)

 

रणबीर कपूर आपल्या चित्रपटांच्या शूटनिमित्त सतत बाहेर असतो. नुकतंच ब्रह्मास्त्र (Brahmastra) या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचे रणबीरचे फोटो आलियाने (Alia Bhatt) सोशल मीडियावर शेअर केले होते. अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र या सिनेमात रणबीर आणि आलिया हे बॉलिवूडमधलं सगळ्यात हॉट कपल पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. याशिवाय शमशेरा या सिनेमासाठीही रणबीरचं काम सुरू आहे. या चित्रपटात संजय दत्त आणि वाणी कपूर असणार आहेत.

 

यासोबतच श्रद्धा कपूरसोबतही एका चित्रपटात रणबीरचं काम सुरू आहे. श्रद्धा आणि रणबीरही पहिल्यांदाच एकत्र काम करताना पाहायला मिळतील. या चित्रपटांच्या शूटसाठी रणबीर सातत्यानं सेटवर जायचा. मात्र या सगळ्यातच रणबीरला आता कोरोनाची लागण झाली आहे. तूर्तास तरी रणबीर घरीच क्वॉरंटाईन झाला आहे.