रणदीप हुड्डाच्या अपयशामागे सुष्मिता सेन? अभिनेता म्हणतो 'अनेक चुकीच्या गोष्टी घडल्या, मी त्या वेळी...'

Randeep Hooda on Sushmita Sen Breakup : रणदीप हुड्डाचा आज 47 वा वाढदिवस आहे. रणदीप हुड्डा आणि सुष्मिता सेन एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपविषयी अनेक दिवस चर्चा सुरु असताना अचानक त्यांचा ब्रेकअप झाला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 20, 2023, 11:46 AM IST
रणदीप हुड्डाच्या अपयशामागे सुष्मिता सेन? अभिनेता म्हणतो 'अनेक चुकीच्या गोष्टी घडल्या, मी त्या वेळी...' title=
(Photo Credit : Social Media)

Randeep Hooda on Sushmita Sen Breakup : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा त्याच्या दर्जेदार अभिनयासाठी ओळखला जातो. रणदीपनं त्याच्या करिअरमध्ये आजवर अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केलं. त्यानं अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केलं असलं तरी देखील त्याच्या खासगी आयुष्याची नेहमीच चर्चा रंगली आहे. रणदीपनं आजवर अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. पण सगळ्यात जास्त चर्चा ही अभिनेत्री सुष्मिता सेनसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे होती. दोघे तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते, पण त्यांनी लग्न केलं नाही. आज रणदीपचा 47 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं रणदीप हुड्डा आणि सुष्मिता सेनच्या रिलेशनशिपविषयी जाणून घेऊया...

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणदीप हुड्डा आणि सुष्मिता सेन हे जवळपास 3 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिले. त्यांची पहिली भेट ही चित्रपटाच्या सेटवर सांगितलं होतं. शूटिंग दरम्यान, ते एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रिण झाले. त्यानंतर त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. पण त्या दोघांचं नातं जास्त काळ टिकलं नाही. त्यावर बोलताना रणदीप हुड्डा म्हणाला की 'जेव्हा मी रिलेशनशिपमध्ये होतो तेव्हा अनेक चुकीच्या गोष्टी घडल्या. बऱ्याचवेळा आपलं नातं जपण्यासाठी आपण वेगवेगळे मार्ग निवडतो. मला कळलं की मी माझ्या नात्याला करिअरपेक्षा जास्त वेळ आणि महत्त्व दिलं. ब्रेकअपनंतर मी स्वत: ला वेळ द्यायला लागलो आहे.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : Gadar 2 च्या कलाकाराची पब्लिक धुलाई, कारण ऐकलत का?

रणदीप हुड्डाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो. त्यानं 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मानसून वेडिंग' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्या चित्रपटाचे दिग्दर्शन मीरा नायर यांनी केलं होतं. या चित्रपटात रणदीप हुड्डानं एका NRI ची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यानं रामगोपाल वर्मा यांच्या डी या चित्रपटात देखील काम केले होते. रणदीप 'डरना जरूरी है', 'हायवे', 'रिस्क', 'रूबरू' आणि 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' सारख्या चित्रपटांमध्ये दिसला आहे. तर लवकरच 'स्वातंत्र वीर सावरकर' या चित्रपटात तो दिसणार आहे. या चित्रपटात रणदीपनं फक्त अभिनय केला नाही तर त्यासोबत दिग्दर्शन देखील केले आहे. रणदीप हुड्डा आधी लोकप्रिय बॉलिवूड दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होते.