रणविजय सिंहनंतर 'हा' अभिनेता बनणार Rodies चा नवा चेहरा

रणविजय सिंहच्या जागी दिसणार आता हा अभिनेता, ज्याने नॅशनल हिरो म्हणून कमावली ओळख 

Updated: Feb 4, 2022, 12:28 PM IST
रणविजय सिंहनंतर 'हा' अभिनेता बनणार Rodies चा नवा चेहरा title=

मुंबई : Rodies आणि रणविजय सिंह यांच्या चाहत्यांसाठी खूप धक्कादायक बातमी समोर आली. गेल्या १८ वर्षांपासून रोडीजशी जोडला गेलेला अभिनेता रणविजय सिंह या शोमधून बाहेर पडला आहे. पण आता रणविजय सिंहची जागा कोण घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं. 

रणविजय सिंहच्या जागी आता नॅशनल हिरो ठरलेला अभिनेता सोनू सूद दिसणार आहे. तुम्ही अगदी बरोबर वाचत आहात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

सोनू सूदबाबत प्रोडक्शन टीमने दिलेली माहिती महत्वाची आहे. या कार्यक्रमाची शुटिंग पुढच्या महिन्यात सुरू होणार आहे. सोनू सूद सध्या पंजाब इलेक्शनमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे निवडणूकांनंतर रोडीज या प्रोजेक्टकडे वळणार आहे.

रणविजय सिंहच्या जागी आता सोनू सूद दिसणार आहे. कोरोनाकाळात सोनू सूद देवदूत ठरला. मिळालेल्या माहितीनुसार सोनू सूदने याबाबत एमटीवीच प्रपोझल देखील स्वीकारल्याचं म्हटलं जात आहे. 

रोडिजच शूटिंग दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. अशा परिस्थितीत सोनू पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. त्यानंतर तो मलेशियाला जाणार आहे. 

मात्र सोनू या शोसोबत किती काळ जोडलेला आहे. याबाबत माहिती नाही. रणविजय आणि चॅनल यांच्यात क्रिएटिव मतमतांतर झाले आहे. त्यामुळे रणविजय आता या शोचा भाग नाही. 

णविजय सिंहने रोडिजला कायमच अलविदा म्हटलं आहे. अशी चर्चा आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

रणविजय सिंहने एका मुलाखतीत अशी माहिती दिलीकी, रोडीजच्या पुढच्या सिनझनमध्ये तो सहभागी नाही. या सगळ्या प्रवासात वाहिनीचा खूप मोठा वाटा आहे. रणविजय सिंहने आभार मानले असून आपण वाहिनीसोबत जोडले जाणार असल्याचं म्हटलं आहे.