'माझ्या आयुष्यात निर्णय...', आई-वडिलांवर का भडकली रश्मिका?

रश्मिकानं नुकत्याच एका चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. 

Updated: Oct 7, 2022, 09:18 PM IST
'माझ्या आयुष्यात निर्णय...', आई-वडिलांवर का भडकली रश्मिका? title=

Rashmia Mandanna On her Parents:  पुष्पा या चित्रपटानंतर रश्मिका मंदाना हे नावं प्रेक्षकांच्या नजरेत आलं. (Rashmika Mandanna in Pushpa) या चित्रपटातील सामे सामे या गाण्यामुळे आणि त्यातील डान्स स्टेपमुळे रश्मिका मंदाना इन्टाग्राम रील्सवरही फिरायला लागली. रश्मिका सध्या नानाविध गोष्टींमुळे चर्चेत असते. आपल्या लव्ह अफेअरपासून ते नुकत्याच नवरात्रीतल्या तिच्या डान्सपर्यंत. रश्मिकाचं नावं सर्वत्र फेमस झालं आहे. आता रश्मिका पुन्हा एकदा एका नव्या कारणासाठी चर्चेत आली आहे. यावेळी मात्र कारण फार वेगळं आहे. (Rashmika instagram reels)

रश्मिकानं नुकत्याच एका चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे (Rashmika Mandanna Bollywood Debut). विकास बहलच्या गुडबाय या चित्रपटातून तिनं हिंदी बॉलीवूडक्षेत्रात पदार्पण केलं आहे. या चित्रपटात तिच्यासोबत बॉलीवूडचे बीग बी अमिताभ बच्चन (Rashmika Mandanna & Amitabh Bachchan) हे देखील होते. 

आणखी वाचा  - 'हर हर महादेव' चित्रपटातील भुमिकेबद्दल अभिनेता सुबोध भावेचा मोठा निर्णय

नुकतंच रश्मिका मंदानानं आपल्या आईवडिलांसोबत एक गोष्ट शेअर केली आहे. याबद्दल रश्मिका म्हणाली की कौटुंबिक आणि प्रोफेशनल जीवनात रेषा आखून ठेवली आहे आणि हीच गोष्ट मी माझ्या आईवडिलांनाही बजावून सांगितली आहे असं रश्मिकानं सांगितलं. (Rashmika Mandanna on her parents)

रश्मिकाचे आईवडिल या इंडस्ट्रीतील नाही त्यामुळे आपल्याला त्यांना अनेक गोष्टी समजावून देणं हे कठीण जातं असं तिनं एका मुलाखती दरम्यान सांगितलं. 

रश्मिका म्हणते की, “माझ्या आईला वाटले की इंडस्ट्री ही अशी एक गोष्ट आहे जेथे आपण जे काही करू शकतो त्यासाठी स्वातंत्र्य आहे. आम्हाला जे काही करायचे आहे ते आम्ही या उद्योगात करू शकतो. तुमचे कुटुंब काय करते हे महत्त्वाचे नाही, तुम्ही एक कलाकार आहात, असे तिनं सांगितलं.'' 

रश्मिकानं यावेळी कबूल केले की या क्षेत्रात आल्यावर तिच्या लक्षात आलं की आपले आईवडिल या क्षेत्रातले नसल्याने आपल्याला काही बाबतीत अनेक गोष्टी कठीण जात आहेत. ती म्हणते की, “आता मला समजले आहे की आईवडिल या इंडस्ट्रीतील नसल्यानं मी त्यांना सांगितले आहे की तुम्ही इंडस्ट्रीतील नाही म्हणून तुम्ही क्षेत्रात जास्त सहभाग दर्शवू नका. आपण एकमेकांचे आयुष्य कौटुंबिक आणि प्रोफेशनल लाईफसाठी वेगळे ठेवूया. मला माझे निर्णय घेऊ देत आणि त्यानूसार मला जगू देत, अशी माहिती तिनं दिली. 

आणखी वाचा - प्रेग्नंट आलियाला त्यानं Kiss केलं तेव्हा... घरचे झाले शॉक!

रश्मिकाने सांगितले की, तिला तिच्या आईवडिलांना हे समजावून द्यावे लागले की ते तिच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. “मला माझ्या स्वतःच्या निवडी करू द्या, माझ्या आयुष्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू नका कारण जग तुमच्या विचाराप्रमाणे नाही. ते खूप मोठे आहे, खूप कठीण आहे. असं रश्मिकानं वेळोवेळी आपल्या आईवडिलांना सांगितलं आहे असं तिनं सांगितलं.

रश्मिका पुढे रणबीर कपूर स्टारर अॅनिमल या चित्रपटात दिसणार आहे. (Rashmika Mandanna Upcoming Movies)