Raveen Tandon का खरेदी करते जुन्या गाड्या? स्वत:च केला मोठा खुलासा

रवीनानं एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Updated: Oct 24, 2022, 11:55 AM IST
Raveen Tandon का खरेदी करते जुन्या गाड्या? स्वत:च केला मोठा खुलासा title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन ही (Raveena Tandon) लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रवीना गेली अनेक दशकांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. अनेक चित्रपटांमधील तिच्या उत्कृष्ट अभिनय आणि पारंपारिक भूमिकांमुळे रवीनाने भारतीय चित्रपटसृष्टीत स्वत:साठी एक स्थान निर्माण केले. मात्र, 'टीप टिप बरसा पानी' या गाण्यावरील तिच्या धमाकेदार डान्स मुव्ह्सनं सगळ्यांना वेड लावलं आहे. आडही रवीनाचे लाखो चाहते आहेत. रवीनानं नुकतीच एक कार खरेदी केली आहे, ज्याची खूप चर्चा होत आहे, या गाडीची चर्चा का सुरु आहे चला जाणून घेऊया...

कारखाना शोमध्ये रणविजय सिंगसोबत झालेल्या संभाषणात, रवीनानं तिच्या पहिल्या कारबद्दल सांगत शेअर केले की तिने तिची पहिली कार फक्त 18 वर्षांची असताना खरेदी केली होती. रवीनानं सांगितलं की ही एक जुनी स्पोर्ट्स कार होती जी तिनं तिच्या पहिल्या कमाईने खरेदी केली होती. रवीना म्हणाली, 'ज्या दिवशी मी 18 वर्षांची झाली, तेव्हा मी माझी पहिली कार घेतली, जी वापरलेली म्हणजेच सेकेन्ड हॅंड कार होती. ही गाडी कोणी तरी आधी वापरली होती आणि त्यांनी ती विकायला काढली होती. मी माझ्या पहिल्या कमाईने ती विकत घेतली. त्यानंतर माझी पहिली नवीन कार होती मारुती 1000 आणि त्यानंतर दुसरी वापरलेली कार म्हणजे माझी पजेरो, आम्ही तिला 'रोड क्वीन' म्हणायचो.

पुढे या विषयी बोलताना रवीनाला विचारलं की कार विकत घेताना ती सहसा काय पाहते. त्यावर रवीना म्हणाली की, तिला आरामदायी आणि मोठ्या गाड्या आवडतात. त्याबद्दल बोलताना ती पुढे म्हणाली, 'तुम्ही मला विचाराल तर, ज्या गाड्यांमध्ये खूप तंत्रज्ञान आहे त्याची मला खूप भीती वाटते. मी आराम आणि खूप जागा आहे का पाहते, जे खूप महत्वाचे आहे. (Raveena Tandon Buys Second Hand Cars she Has Same Number For Every Car actress reveled)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जेव्हा रवीनाला विचारण्यात आलं की तिच्या कुटुंबात एखाद्या विशिष्ट दिवशी, सण किंवा तारखेला कार खरेदी करण्याची काही खास प्रथा आहे का, तेव्हा तिनं सांगितलं की ती काही शुभ दिवस असेल तरच कार खरेदी करते. तिच्या सर्व गाड्या एकाच क्रमांकाशी संबंधित आहेत, म्हणजेच 16 नंबर. 

या विषयी बोलताना रवीना म्हणाली, 'आम्ही नेहमी शुभ दिवशी कार खरेदी करतो. पण हो, आमच्या सर्व वाहनांवर सारखीच नंबरप्लेट आहे, कारण त्या सगळ्या माझ्या मुलीच्या मुलीच्या वाढदिवसाला विकत घेतलेल्या असतात. आमच्या सर्व गाड्या एकाच तारखेच्या आहेत. असं नाही की सगळ्या गाड्यांचा नंबर हा 16 आहे... पण ते सगळे नंबर हे 16 नंबरशी जोडलेले आहेत.