Rishi Kapoor Photo: रणबीर-आलियाच्या लग्नात ऋषी कपूर यांची उपस्थिती

ऋषी कपूर यांची Family Photo मध्ये दिसली एक झलक... त्यांना पाहून कुटुंबाला आनंद...  

Updated: Apr 18, 2022, 07:49 AM IST
Rishi Kapoor Photo: रणबीर-आलियाच्या लग्नात ऋषी कपूर यांची उपस्थिती title=

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांनी 14 एप्रिल रोजी कुटुंब आणि खास मित्र परिवाराच्या उपस्थितीत लग्न केलं. अनेक दिवसांपासून गुपित ठेवण्यात आलेल्या लग्नाचे फोटो अखेर लग्नानंतर तुफान व्हायरल झाले. रणबीर - आलियाचे फोटो, कुटुंबाचे फोटो, मित्रांचे फोटो... अनेक फोटोंचा चाहत्यांनी पसंती दर्शवली. पण Family Photo मध्ये एका व्यक्तीची कमतरता भासत होती, ती व्यक्ती म्हणजे दिवंगत अभिनेते आणि रणबीरचे वडील ऋषी कपूर यांची....

पण सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ऋषी कपूर दिसत आहेत. Family Photo मध्ये ऋषी कपूरयांची एक झलक पाहायला मिळाल्यामुळे फक्त चाहतेचं नाही, तर समस्त कपूर कुटुंबाला देखील प्रचंड आनंद झाला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फोटोमध्ये महेश भट्ट (Mahesh Bhatt), सोनी राजदान (Soni Razdan), रिद्धिमा साहनी कपूर (Riddhima Kapoor), शाहीन भट्ट (Shaheen Bhatt), नीतू कपूर रणबीर आणि आलियासोबत पोज देताना दिसत आहे...

फोटोमध्ये ऋषी कपूर नसल्यामुळे फोटोशॉपच्या मदतीने Family Photo मध्ये ऋषी कपूर यांचा समावेश करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे, जेव्हा फोटो इडिट करण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला तेव्हा रिद्धीमाने तिच्या इन्स्टग्राम स्टोरीवर व्हिडीओ पोस्ट केला...