रितेश देशमुखनं पाहिला 'जवान', प्रेक्षकांना आव्हान करत म्हणाला, 'हातातलं सगळं सोडून द्या आणि...'

Riteish Deshmukh on Jawan: जवान या चित्रपटानं सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख यानंही शाहरूख खानचा जवान हा चित्रपट पाहिला असून आता त्यानं ट्विटरवरून खास प्रतिक्रियाही दिली आहे.

गायत्री हसबनीस | Updated: Sep 10, 2023, 04:12 PM IST
रितेश देशमुखनं पाहिला 'जवान', प्रेक्षकांना आव्हान करत म्हणाला, 'हातातलं सगळं सोडून द्या आणि...' title=
riteish deshmukh on jawan shares a special tweet for shah rukh khan

Riteish Deshmukh on Jawan: सध्या चर्चा आहे ती जवान या चित्रपटाची. या चित्रपटानं अल्पावधीतच फार मोठी कमाई केली आहे. त्यामुळे सगळीकडे फक्त याचीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या सर्वांनीच हा चित्रपट पाहिला आहे आणि या चित्रपटाची स्तुती केली आहे. यावेळी अभिनेता रितेश देशमुखनंही शाहरूख खानचा जवान हा चित्रपट पाहिला आहे आणि रितेशनं यावेळी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं आपल्या ट्विटर अकांऊटवरून एक ट्विट शेअर केलं आहे.

ज्या त्यानं शाहरूख खानच्या जवान या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. शाहरूख खानचा जवान हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला असून चार दिवसांत या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली आहे. या चित्रपटाचे एडव्हान्स बुकींगही प्रचंड होते. त्यामुळे फर्स्ट डे फर्स्ट शोला हा चित्रपट धुमाकूळ घालणार याची सर्वांनाच खात्री होती आणि तसे सिद्धही झाले आहे. आता रितेश देशमुखच्या पोस्टनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

हेही वाचा : 'जवान' चित्रपटाच्या यशादरम्यान 'जवान 2' ची चर्चा सुरू?

यावेळी त्यानं ट्विटमध्ये लिहिलंय की, ''हातातलं सगळं सोडून द्या आणि आधी चित्रपटगृहात जा. ‘जवान’ एक इमोशन आहे. हा एक वेगळा अनुभव आहे. थिएटरमध्ये मला जवान पाहताना जो अनुभव आला तो फारच कमाल होता. सगळीकडे टाळ्या, शिट्टया वाजत होत्या. शाहरुख खान हा बॉम्ब आहे. तो मेगास्टार आहे. तो ज्या ज्या सीनमध्ये आहे त्यानं त्या सीनला एक वेगळीच रंगत आली आहे. अॅक्शन, इमोशन, रोमान्स, ड्रामा.. आणि काही बाकी आहे का? काय अप्रतिम चित्रपट बनवला आहे ! हार्दिक अभिनंदन शाहरुख खान आणि टीम.”

शाहरूखनंही त्याच्या ट्विटरला रिप्लाय देत रितेशचे आभार मानले आहेत. त्यामुळे त्याची चांगली चर्चा आहे. शाहरूख खान आणि रितेश देशमुख यांचे एकत्र हे चित्रपट फार कमी आहेत. जवळपास नाहीच. परंतु ते दोधंही एकमेकांचे फॅन्स आहेत. त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. रितेशच्या लग्नाला शाहरूखनं विशेष उपस्थिती लावली होती आणि सोबतच ते अनेकदा एकत्र स्पॉटही होताना दिसतात. यावेळी त्यांची जोरात चर्चा रंगेलली पाहायला मिळाली आहे. रितेशच्या या ट्विटला लाखो लोकांनी व्हू केले असून सध्या त्याची जोरात चर्चा रंगलेली आहे.