निवडणूक निकालांवर रितेश देशमुखचं अप्रत्यक्ष ट्विट

गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीमध्ये भाजपला यश मिळालं. हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला सहज विजय मिळाला.

Updated: Dec 18, 2017, 08:40 PM IST
निवडणूक निकालांवर रितेश देशमुखचं अप्रत्यक्ष ट्विट  title=

मुंबई : गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीमध्ये भाजपला यश मिळालं. हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला सहज विजय मिळाला. तर मोदी आणि भाजपचा गड असलेल्या गुजरातमध्ये मात्र काँग्रेसनं जोरदार टक्कर दिली.

दरम्यान या निकालावर अभिनेता रितेश देशमुखनं अमर अकबर अॅथनी चित्रपटातल्या डायलॉगचा एक व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केला आहे. "तुम अपुनको दस-दस मारा, अपुन तुमको सिर्फ दो मारा पर सॉलीड मारा की नही?", अमिताभ बच्चन यांनी विनोद खन्नांना मारलेला हा डायलॉग रितेशनं ट्विट केला आहे.

या ट्विटवर रितेशनं निवडणुकींचा कोणताही उल्लेख टाळला आहे. पण आजच्या दिवसाचा डायलॉग असं कॅप्शन त्यानं या व्हिडिओला दिलं आहे. रितेश देशमुखचे वडिल विलासराव देशमुख हे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तसंच रितेशचा भाऊ अमित देशमुख हे सध्या काँग्रेसचे आमदार आहेत.