धर्मेंद्र यांनी शबाना आझमी यांना किस केल्याने गदारोळ; स्पष्टीकरण देत म्हणाले "जबरदस्तीने..."

Rocky Aur Rani Ki Prem Kahani: करण जोहरने (Karan Johar) तब्बल सात वर्षांनी 'रॉकी और राणी की प्रेम कहानी'मधून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. दरम्यान या चित्रपटात धर्मेंद्र (Dharmendra) आणि शबाना आझमी (Shabana Azmi) यांचा किसिंग सीन असल्याने चर्चा रंगली आहे. यावर आता धर्मेंद्र यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 31, 2023, 01:33 PM IST
धर्मेंद्र यांनी शबाना आझमी यांना किस केल्याने गदारोळ; स्पष्टीकरण देत म्हणाले "जबरदस्तीने..." title=

Rocky Aur Rani Ki Prem Kahani: करण जोहरने (Karan Johar) तब्बल सात वर्षांनी 'रॉकी और राणी की प्रेम कहानी'मधून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं आहे. आलिया भट आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असून, चित्रपटात कलाकारांची फौजच आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला असून कमाईतही अव्वल ठरत आहे. दरम्यान या चित्रपटात धर्मेंद्र (Dharmendra) आणि शबाना आझमी (Shabana Azmi) यांचा किसिंग सीन असल्याने चर्चा रंगली आहे. यावर आता धर्मेंद्र यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 

धर्मेंद्र यांनी News18 ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “माझ्या आणि शबानाच्या किसिंग सीनने प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला अशी माहिती मला मिळत आहे. त्यांनी या सीनचं कौतुक केल्याचंही मला समजलं. मला वाटतं प्रेक्षकांना हे अपेक्षित नव्हतं. अचानक हा सीन आल्याने त्याचा वेगळा प्रभाव पडत आहे. याआधी 'लाईफ इन अ मेट्रो' चित्रपटात मी नफिरासह किसिंग सीन दिला होता. त्यावेळीही लोकांनी कौतुक केलं होतं".

"करण जोहरने जेव्हा आम्हाला सीन सांगितला, तेव्हा आम्ही फार उत्साहीत झालो नाही. या सीनची गरज असून, तो जबरदस्तीने टाकण्यात आलेला नाही याची मला, शबाना आणि करणला जाणीव होती. त्यामुळे मी हा सीन करण्यास होकार दिला. तसंच रोमान्ससाठी वय असतं असं मला वाटत नाही. वय हा फक्त एक नंबर असून, वय न पाहता दोन व्यक्ती एकमेकांना किस करुन आपलं प्रेम व्यक्त करतात असं मला वाटतं. मला किंवा शबानाला हा सीन करताना कोणालाही अवघड वाटलं नाही," असं धर्मेंद्र यांनी सांगितलं.

धर्मेंद्र यांनी यावेळी इतका सुंदर चित्रपट केल्याबद्दल करण जोहरचं कौतुक केलं. ते म्हणाले "करण जोहरने सुंदर चित्रपट बनवला आहे. तो एक चांगला दिग्दर्शक आहे. हा माझा त्याच्यासह पहिला चित्रपट होता आणि मला काम करताना मजा आली. सर्वांनी चांगलं काम केलं आहे. रणवीर जबरदस्त आहे, तर आलिया एक नैसर्गिक अभिनेत्री आहे. शबाना आणि जया यांनीही चांगलं काम केलं आहे".

'रॉकी और रानी की प्रेम कहानी'च्या संवाद आणि सह-पटकथा लेखिका इशिता मोईत्रा यांनीही चित्रपटातील शबाना आझमी आणि धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवर आपली बाजू मांडली आहे. स्क्रिप्टनुसारच हा सीन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. “लोकांचा विश्वास बसत नव्हता की आता किसिंग सीन येत आहे. स्क्रिप्टमध्ये नेहमीच हा सीन होता. करणने ही सीन आदरपूर्वक वाटेल अशा पद्दतीनेच जाईल याची खात्री केली होती. मला वाटत नाही की त्यांच्यापैकी कोणाला काही समस्या होत्या,” असं तिने सागितलं आहे. हा चित्रपट 28 जुलैला प्रदर्शित झाला आहे.