हा क्रिकेटर अखेर युवा मराठी अभिनेत्रीकडून क्लीन बोल्ड....इन्स्टाग्रामवर रंगली लव्हस्टोरी

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी आपल्या लग्नासाठी क्रिकेटर्सची निवड केली आहे.

Updated: May 6, 2021, 08:08 PM IST
हा क्रिकेटर अखेर युवा मराठी अभिनेत्रीकडून क्लीन बोल्ड....इन्स्टाग्रामवर रंगली लव्हस्टोरी title=

मुंबई : एंटरन्मेंट इंडस्ट्रीतील कलाकार आणि क्रिकेर्टचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी आपल्या लग्नासाठी क्रिकेटर्सची निवड केली आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा देखील एक अभिनेत्री आहे. अशा परिस्थितीत आता एक नवीन नाव समोर येत आहे. होय, आता चेन्नई सुपर किंग्जचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड आयपीएल २०२१ मध्ये चांगला फॉर्मात होता, आता आयपीएल पुढे ढकलल्यामुळे ऋतुराजलाही आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सक्रीय व्हायला वेळ मिळाला आहे.  

आता या खेळाडूबद्दल एक बातमी आली आहे. असं म्हटलं जात आहे की, ऋतुराज या दिवसात एका मराठी अभिनेत्रीवर फिदा झाला आहे. अभिनेत्री सयाली संजीव आणि ऋतुराजचं नातं जरा स्पेशल होताना दिसत आहे. तिच्या फोटोवर त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामुळे हे दोघंही आता चर्चेत आले आहेत.

नुकतीच अभिनेत्री सयाली संजीवने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही खास फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर ऋतुराजने त्या फोटोंवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ऋतुराजने सयालीचे फोटो पाहिल्यानंतर 'वोहहहह' अशी कमेंन्ट केली आहे. यासोबतच त्याने हार्टचे ईमोजी या कमेंन्टमध्ये दिले आहेत. खेळाडूची ही स्टाईल पाहिल्यानंतर असं वाटत आहे की, तो आता सयालीसाठी क्लीन बोल्ड झाला आहे.  सोशल मीडियावरील दोघांचे चाहते या कमेंट नंतर बरीच चर्चा करत आहेत.

सायलीची प्रतिक्रिया
त्याचबरोबर ऋतुराजच्या या कमेंटनंतर सयालीनेही त्याला रिप्लाय दिला आहे. या रिप्लायनंतर चाहते चकीत झाले आहेत तर सायलीच्या काहि चाहत्यांची हृद्य तुटली आहेत. सायलीने आपल्या कमेंन्टमध्ये हार्ट आणि लाजिरवाणे इमोजी शेअर केले आहेत. या दोघांच्या चर्चेनंतर सोशल मीडियावर या दोघांचा बोलबाला असल्याचा पहायला मिळत आहे. यानंतर या दोघांमध्ये गोड नातं असल्याचं दिसतंय.

या दोघांच्या कमेंट वाचल्यानंतर या दोघांवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. सायलीने 'काहे दिया परदेश' या मालिकेसह अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. इतकंच नाही तर सायलीने बर्‍याच मोठ्या मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. सायली हा मराठी इंडस्ट्रीचा चेहरा आहे.