'कॉलेज बंक करून एअर होस्टेससोबत...', शर्मिला टागोर यांनी केली पोलखोल, सैफ अली खानला बसला धक्का!

Koffee With Karan 8 Promo : कॉफी विथ करण 8 च्या नव्या एपिसोडमध्ये बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif ali khan) याने आई शर्मिला टागोर (Sharmila Tagore) सोबत हजेरी लावली होती.

सौरभ तळेकर | Updated: Dec 25, 2023, 08:17 PM IST
'कॉलेज बंक करून एअर होस्टेससोबत...', शर्मिला टागोर यांनी केली पोलखोल, सैफ अली खानला बसला धक्का! title=
Sharmila Tagore On Saif Ali Khan, Koffee With Karan 8 Promo

Sharmila Tagore On Saif Ali Khan : दिग्दर्शक करण जोहर याचा 'कॉफी विथ करण' हा कार्यक्रमाचा सध्या आठवा सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. बॉलिवूडमधील गॉसिप आणि मजेशीर गोष्टींचा खुलासा या शोच्या माध्यमातून समोर येतो. या शोच्या एपिसोडमध्ये आतापर्यंत अनेक स्टार्स सहभागी झाले. यंदाच्या सीझनमध्ये (KWK 8 Promo) अनेक लोकप्रिय कलाकारांनी उपस्थिती लावली होती. अशातच आता नव्या एपिसोडमध्ये बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif ali khan) याने आई शर्मिला टागोर (Sharmila Tagore) सोबत हजेरी लावली. त्यावेळी शर्मिला टागोर यांनी असे काही खुलासे केले आहेत की, सैफ अली खानने करण जोहरसमोर एक मागणी केल्याची पहायला मिळालं.

नवीन प्रोमोमध्ये दिसतंय की, अभिनेता सैफ अली खान याने आई शर्मिला टागोर यांच्यासह करण जोहरच्या मंचावर हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांवर गप्पा मारल्या अन् मजेशीर किस्से देखील सांगितले आहेत. मी येथे येईन, अशी मला अपेक्षा नव्हती. आणि मला अजून काय अपेक्षित आहे हे माहित नाही, असं सैफ यावेळी म्हणतो. आईसोबत असल्यावर करणने नेहमीचा प्रश्न विचारला. आईने तुला शेवटचं कधी रागावलं होतं? असा प्रश्न विचारताच, आत्ताच एक मिनिटापूर्वी, असं उत्तर सैफने दिलं.

करणने पुढची गुगली टाकली. करीना तुझ्यावर कशाप्रकारे फिदा आहे? असा सवाल करण विचारतो. त्यावर सैफला थोडा गोंधळात पडतो. त्यानंतर करणला हसू आवरलं नाही. हा अश्लिल प्रश्न नव्हता सैफ, असं स्पष्टीकरण करण देतो. त्यानंतर शर्मिला टागोर यांच्याकडून करणने काही गुपितं काढून घेतली.

शर्मिला टागोर यांनी सैफ अली खानच्या कॉलेजमधील एक किस्सा सांगितला. सैफ कॉलेजलाही जात नव्हता आणि एअर होस्टेसना बाहेर पाठवून तो कुठेतरी जायचा, असं शर्मिला टागोर म्हणतात. त्यावेळी सैफने नाराजी व्यक्त केली. या गोष्टी अतिशयोक्त केल्या जात आहेत. मला माझा वेगळा एपिसोड पाहिजे, असं सैफ अली खान म्हणतो. या सर्व गोष्टी मजेशीर अंदाजात झाल्याचं पहायला मिळालंय.

पाहा Video

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

दरम्यान, कॉफी विथ करणच्या 8 व्या सीझनमध्ये आतापर्यंत दीपिका पादुकोण,रणवीर सिंह, बॉबी देओल, सनी देओल, आलिया भट्ट, करीना कपूर,वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, राणी मुखर्जी, काजोल, विकी कौशल, कियारा आडवणी,अर्जुन कपूर, आदित्य रॉय कपूर या सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे.