सैफ अली खानच्या दोन्ही बायका एकेमेकींना का भेटल्या नाहीत ?

अभिनेत्री अमृता सिंग हिच्याशी सैफनं लग्नगाठ बांधली होती. पण...

Updated: Jan 17, 2022, 03:53 PM IST
सैफ अली खानच्या दोन्ही बायका एकेमेकींना का भेटल्या नाहीत ?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री करिना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांची जोडी बॉलिवूडमधील काही आघाडीच्या जोड्यांपैकी एक. करिना आणि सैफच्या नात्याचा कायमच सर्वांना हेवा वाटला. पण, या साऱ्यामध्ये एका गोष्टीचं कुतूहलही होतं. 

ती गोष्ट म्हणजे सैफचं खासगी आयुष्य. अभिनेत्री अमृता सिंग हिच्याशी सैफनं लग्नगाठ बांधली होती. पण, त्यांचा संसार फार काळ चालला नाही. 

पुढे दोन मुलांच्या जन्मानंतर त्याचा आणि अमृताचा घटस्फोट झाला. ज्यानंतर त्यानं करिनाशी लग्न केलं. 

जेव्हा करिनाला एका कार्यक्रमात सैफच्या पहिल्या पत्नीबद्दल प्रश्न विचारला गेला तेव्हा तिची प्रतिक्रिया पाहण्याजोगी होती. 

कॉफी विद करण, या लोकप्रिय चॅट शोमध्ये करिनाला अमृताशी कधी तुझी भेट झाली आहे का असा प्रश्न विचारला गेला. 

प्रश्नाचं उत्तर देत करिना जे म्हणाली त्याची अनेकांना अपेक्षाही नसावी. 

'मी त्यांचा आदर करते. पण, आतापर्यंत आमची प्रत्यक्ष भेट झालेली नाही. खरंतर अमृतासोबतच्या घटस्फोटाला अनेक वर्षे उलटून गेल्यानंतर सैफ माझ्या आयुष्यात आला होता', असं ती म्हणाली. 

करीना आणि अमृता कधीच भेटल्या नाहीत, यामागचं मुख्य कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे. पण, तरीही या दोघींचं सैफच्या जीवनात असणारं स्थान नाकारता येत नाही.

सैफ आणि अमृता 2004 मध्ये विभक्त झाले. ज्यानंर त्याच्या जीवनात मॉडेल रोजा हिची एंट्री झाली होती. 

2007 - 08 च्या दरम्यान रोजासोबतचं सैफचं नातं तुटलं आणि करिनानं त्याच्या आयुष्यात प्रवेश केला. 

पुढे, 'टशन' या चित्रपटाच्या निमित्तानं सैफ आणि करिनाची जवळीक वाढत गेली. हा चित्रपट फारचा चालला नाही, पण सैफच्या जीवनात करिनाची एंट्री मात्र सुपरहिट ठरली. 

पुढे, या दोघांनीही लग्न करत एका नव्या प्रवासाची सुरुवात केली.