Amrita Singh Saif Ali Khan: जिच्यामुळं सैफनं गाठलं यशशिखर, तिलाच का दिला घटस्फोट?

या नात्यानं मात्र थोडक्यातच आवरतं घेतलं.... याला प्रेम म्हणावं? 

Updated: Sep 28, 2022, 10:40 AM IST
Amrita Singh Saif Ali Khan: जिच्यामुळं सैफनं गाठलं यशशिखर, तिलाच का दिला घटस्फोट?  title=
Saif Ali Khan was successful after getting married with Amrita Singh what was reason of their marriage failure

Amrita Singh Saif Ali Khan: अभिनेता सैफ अली खान हा हिंदी चित्रपटसृष्टीत आणखी एका नावानं ओळखला जातो. ते नाव म्हणजे नवाब..... राजघराण्याचा वारसा असणाऱ्या सैफनं कुटुंबाची ओळख जपत कलाक्षेत्रात आपलीही नवी ओळख तयार केली. त्याच्यासाठीही करिअरच्या सुरुवातीचे दिवस फारसे सोपे नव्हते. अपयशाचा सामना त्याला वारंवार करावा लागला होता. पण, एका व्यक्तीच्या येण्यानं हे सर्व बदललं होतं. ही व्यक्ती म्हणजे सैफची Ex Wife अमृता सिंग. 

1991 मध्ये सैफ आणि अमृतानं गुपचूप लग्न उरकलं होतं. त्यांच्या लग्नाचं वृत्त समोर आलं आणि अनेकांनाच धक्का बसला. कारण, हे कोणालाही अपेक्षित नव्हतं. अमृता सैफहून 12 वर्षे मोठी होती. शिवाय ती आघाडीची अभिनेत्री होती. 

उलटपक्षी सैफ वयानं कमी होताच. शिवाय त्याचा बॉलिवूडमध्येही (Bollywood) फारसा जम बसला नव्हता. सुरुवातीला कुटुंबाचा विरोध असतानाही त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या एका निर्णयानं जणू सैफच्या आयुष्यालाही कलाटणी दिली (Saif Ali khan movies). कारण, लग्नानंतर त्याला कलाजगतात महत्त्वं दिलं जाऊ लागलं. हळूहळू अमृता प्रकाशझोतातून नकळतच मागे गेली आणि सैफ प्रसिद्धी मिळवू लागला. 

एकामागून एक चित्रपट त्याच्या वाट्याला होते आणि तो दणकून कमाई करत होते. 1992 - 93 हा तोच काळ होता जेव्हा अमृतानं चित्रपटांपासून बराच दुरावा पत्करला आणि सैफ यशशिखरावर पोहोचला. ज्या अमृताच्या येण्यानं सैफ खऱ्या अर्थानं त्याच्या पायांवर उभा राहिला होता त्याच अमृतावर त्यानं प्रेम केलं. पण, हेच प्रेम 2004 पर्यंत विरलं आणि या जोडीनं घटस्फोटाचा निर्णय घेतला.

अधिक वाचा : 'मुलाचं नाव राम नाही ठेवू शकत...' Saif Ali Khan चा 'तो' व्हिडीओ व्हायरल​

सैफ आणि अमृता यांच्या नात्याला बऱ्याच वर्षांपूर्वी तडा गेला. तो या वळणावरून बराच पुढेही आला. अभिनेत्री करीना कपूरसोबत (Kareena Kapoor khan) त्यानं लग्न करत एका नव्या आयुष्याची सुरुवात केली. अमृतानं मात्र दोन्ही मुलांच्या समगोपनावर भर देत त्यांच्या करिअरसाठी स्वत:च्या आयुष्याला खर्ची पाडलं.