'टायगर जिंंदा है'च्या ट्रेलरमध्ये सलमान खान पेक्षा 'या' अभिनेत्यावर खिळल्या नजरा

काल 'टायगर जिंदा है'चा ट्रेलर रसिकांच्या भेटीला आला.

Updated: Nov 8, 2017, 10:38 AM IST
'टायगर जिंंदा है'च्या ट्रेलरमध्ये सलमान खान पेक्षा 'या' अभिनेत्यावर खिळल्या नजरा  title=

 मुंबई : काल 'टायगर जिंदा है'चा ट्रेलर रसिकांच्या भेटीला आला.

सलमान आणि कॅटरिना कैफ या जोडीचा रोमान्स आनि अ‍ॅक्शन पुन्हा बघायला मिळणार या आशेने रसिक या ट्रेलरची वाट पाहत होते. चाह्त्यांच्या अपेक्षेप्रमाणे 'टायगर...' मध्ये या दोन्ही गोष्टी ठासून भरल्या आहेत. त्यामुळे ट्रेलरला उदंड प्रतिसाद मिळत आहे. 

 'टायगर जिंदा है' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अजून एका व्यक्तीने चाह्त्यांचे लक्ष आकर्षित केले आणि ते म्हणजे या चित्रपटातील खलनायक अबु उस्मान ! 

 

Close up... #dubai #sea #smile #camera #morning

A post shared by Sajjad Delafrooz (@sajjad_delafrooz) on

 

   २५  नर्सना कैद करणारा उस्मान कोणी साकारलाय हा प्रश्न अनेकांच्या मनात डोकावला आहे. तर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आहे... ' साजद डेलाफ्रूज'.    'टायगर जिंदा है' या चित्रपटापूर्वीदेखील त्याने अक्षय कुमार सोबत 'बेबी' चित्रपट केला आहे. मात्र त्यामध्ये त्याची भूमिका फारच लहान होती.  त्यामुळे अनेकांच्या तो लक्षातही नसेल. 

   'टायगर जिंदा है' हा चित्रपट ख्रिस्मसच्या विकेंडला म्हणजेच २२ डिसेंबरला येणार आहे. अली अब्बास दिग्दर्शित हा चित्रपट ' एक था टायगर ' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. यामध्ये सलमान खान आणि कॅटरिना कैफ गुप्तहेरांच्या भूमिकेत आहेत.