सलमान-कतरिनाचा सेटवरील खासगी फोटो समोर, चर्चांना उधाण

सलमान-कतरिनाच्या त्या खासगी फोटोची सर्वत्र चर्चा.... फोटो पाहून तुम्ही देखील म्हणाल...  

Updated: Feb 18, 2022, 10:11 AM IST
सलमान-कतरिनाचा सेटवरील खासगी फोटो समोर, चर्चांना उधाण title=

मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफने अभिनेता विकी कौशलसोबत डिसेंबर महिन्यात लग्न केलं. विकीसोबत लग्न होण्याआधी कतरिनाचं नाव अभिनेता सलमान खानसोबत देखील जोडण्यात आलं. एवढंच नाही तर सलमान आणि कतरिनाला अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. सलमान-कतरिना रिलेशनशिपमध्ये आहेत, अशी चर्चा देखील रंगली होती. अशात सध्या 'टायगर 3' सिनेमाच्या सेटवरून दोघांचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. 

फोटोमध्ये दोघे एकत्र उभे असल्याचं दिसत आहेत. शिवाय एका फोटोमध्ये दोघांच्या चेहऱ्यावर जखम झाल्याचं दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियावर सलमान-कतरिनाचे फोटो व्हायरल होत आहे. 

भाईजानचे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांच्या मनात सिनेमाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दोघांच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. व्हायरल होत असलेला फोटो 'टायगर 3' सिनेमाच्या सेटवरील आहे.

एका युजरने कमेंटमध्ये, 'सिनेमाबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे...', तर दुसऱ्याने कमेंटमध्ये, 'बॉक्स ऑफिसवर वादळ येणार...' असं लिहिलं आहे. भाईजानचा आगामी सिनेमा चाहत्यांच्या पसंतीस पडेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

'टायगर 3' सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मनीष शर्मा यांच्या खांद्यावर आहे. रिपोर्टनुसार साजिद आणि सलमान 2023 रोजी ईदच्या मुहूर्तावर सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. 

त्यामुळे पुढच्या वर्षी सलमानच्या चाहत्यांना 'टायगर 3' सिनेमाची ईदी चाहत्यांकडून मिळणार आहे. त्यामुळे आता चाहत्यांनी कधी सिनेमा पाहाता येणार याच प्रतिक्षेत सर्व आहेत.