व्हिडिओ : सलमानसाठी 'दुल्हन' बनलेल्या कतरिनाचा रॅम्पवॉक

कतरिना कैफ आणि सलमान खान ही बॉलिवूडची लोकप्रिय जोडी लवकरच भारत सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Updated: Aug 2, 2018, 11:27 AM IST
व्हिडिओ : सलमानसाठी 'दुल्हन' बनलेल्या कतरिनाचा रॅम्पवॉक title=
फोटो सौजन्य- gorgeous_katrina/इंस्टाग्राम

मुंबई : कतरिना कैफ आणि सलमान खान ही बॉलिवूडची लोकप्रिय जोडी लवकरच भारत सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रियंका चोप्राने हा सिनेमा अचानक सोडल्याने तिच्या जागी कतरिनाला कास्ट करण्यात आले आहे. याचदरम्यान सलमान-कतरिनाने प्रसिद्ध डिजाईनर मनीष मल्होत्रासाठी रॅम्पवॉक केला. या आवडत्या जोडीच्या रॅम्पवॉकदरम्यान उपस्थितींनी शिट्ट्या वाजवून त्यांचे स्वागत केले. 

मनीष मल्होत्राने मुंबईत 'Haute Couture 2018' चे आयोजन केले होते. त्यात कतरिना कैफ शो टॉपर होती. यावेळेस तिने ब्राईडल लेहंगा परिधान केला होता. तर सलमानने काळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. या लूकमध्ये हे कपल फारच सुरेख दिसत होते.

डिजाईनर मनीष मल्होत्राच्या कलेक्शनची थीम इंडो पर्शियन एरा होती. ज्याची झलक सलमान-कतरिनाच्या ड्रेसमध्ये पाहायला मिळते. यावेळेस मनीष मल्होत्राने मीडियाशी बातचीत करतना सलमान-कतरिनाचे खूप कौतूक केले. मनीष म्हणाला की, दोघेही बॉलिवूडचे सुपरस्टार्स आहेत. तरिही अतिशय विनम्र आहेत. दोघांमध्ये काहीतरी खास गोष्ट आहे. 

सलमान कतरिनाच्या रॅम्पवॉकचे व्हिडिओज खूप व्हायरल होत आहेत. दोघांची स्टाईल काहीशी खास होती. लोकांनी शिट्टया आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. 

सलमान-कतरिना भारत सिनेमात ५ वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसतील. अली अब्बास झफर या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. 

 

Muse @katrinakaif and #SalmanKhan at #ManishMalhotra's fashion show

A post shared by K A T R I N A K A I F (@gorgeous_katrina) on