Salman Khan Birthday : कल्पनाही नसताना सलमानला पाहावा लागला 'तो' दिवस; भरल्या घरात...

Salman Khan Birthday : बॉलिवूडचा दबंग खान (Bollywood Dabang khan), अभिनेता सलमान खान (Samlan Khan) हा मोस्ट अवेडेट बॅचलर आहे असं म्हणायला हरकत नाही

Updated: Dec 27, 2022, 08:31 AM IST
Salman Khan Birthday : कल्पनाही नसताना सलमानला पाहावा लागला 'तो' दिवस; भरल्या घरात...  title=
Salman Khan Birthday once wedding cards were printed but actor remained unmarried latest entertainment news

Salman Khan Birthday : बॉलिवूडचा दबंग खान (Bollywood Dabang khan), अभिनेता सलमान खान (Samlan Khan) हा मोस्ट अवेडेट बॅचलर आहे असं म्हणायला हरकत नाही. हिंदी कलाजगतामध्ये कितीही नवोदित कलाकार आले आणि गेले तरी त्यांच्यामध्ये सलमानची लोकप्रियता काही केल्या कमी झालेली नाही. अशा या अभिनेत्यावर त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कुणी त्याच्यासाठी केक पाठवतंय, कुणी आशीर्वाद देतंय तर कुणी लग्न कधी? असेही प्रश्न करतंय. सलमान आणि त्याचं लग्न याविषयी बोलावं तितकं कमी. कोणा एका नवख्या अभिनेत्रीसोबत तो दिसतो, तिच्यासोबत त्याचं जोडलं जातंच. पण, या साऱ्यामध्ये सलमानची लग्नपत्रिका छापलीये तुम्हाला कुणी सांगितलं का? 

सलमान खानची लग्नपत्रिका... ? (Salman khan wedding card)

जो सलमान लग्नापासून पळ काढतो असंच अनेकांना वाटत होतं, त्याच सलमानची लग्नपत्रिका छापल्याचं ऐकून अनेकांना धक्काच बसतो. तुम्हालाही खरं वाटणार नाही. पण, असं खरंच घडलं आहे. 90 च्या दशकात लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) या अभिनेत्रीसोबत सलमानचं लग्न होणार होतं. 10 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांचं हे नातं, लग्नाच्या वळणावर पोहोचलं होतं. पत्रिका छापल्या, त्या पाहुण्यांपर्यंत पोहोचल्याही होत्या. पण, अखेरच्या क्षणी हे लग्न तुटलं. 

का तुटलं सलमानचं लग्न? 

असं म्हटलं जातं की, त्यावेळी सलमान खान आणि सोमी अली (Somi Ali) यांच्यामध्ये जवळीक वाढत होती. संगीताला ज्यावेळी या नात्याती कुणकुण लागली तेव्हा तिनं हे नातं इथंच थांबवण्याचा निर्णय घेत लग्न तोडलं. सलमानचा संसार सुरु होण्याआधीच उध्वस्त झाला होता. जिथं लग्नाचा जल्लोष होणं अपेक्षित होतं त्या भरल्या घरात शांतता होती. काळ पुढे गेला. सलमान आणि संगीतानं वेगळ्या वाटा निवडल्या.  

Salman Khan attends ex Sangeeta Bijlani's birthday party with rumoured  girlfriend Iulia Vantur

संगीतानं 1996 मध्ये क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन याच्याशी लग्नगाठ बांधल नव्या आयुष्याची सुरुवात केली. सलमानपासून ती खऱ्या अर्थानं दुरावली असली, तरीही आजच्या क्षणाला त्याच्या खास आणि तितक्याच जवळच्या मित्रपरिवारामध्ये संगीताचं नाव आवर्जून घेतलं जातं. प्रेमाच्या वळणापासून सुरु झालेल्या त्यांच्या नात्याला संसार पाहता नाही आला. पण, आज मात्र ते एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत हेच सत्य. 

सलमान लग्न करणार तरी कधी? 

तिथे सलमान आणि संगीताचं नातं तुटलं आणि इथे त्याची नावं असंख्य तरुणी आणि अभिनेत्रींशी जोडली गेली. सोनाक्षी सिन्हा, पूजा हेगडे या नव्या जोमाच्या अभिनेत्रींशीची त्यांचं नाव जोडलं गेलं. तर, ऐश्वर्या राय, करिष्मा कपूर , लुलिया वंतूर यांच्यासोबतचं त्याचं नातंही बरंच चर्चेत राहिलं. आता प्रश्न राहिला सलमानच्या लग्नाचा, तर ते नेमकं कधी होणार याचं उत्तर खुद्द भाईजानच देऊ शकतो.