सलमानला पाच वर्षांची शिक्षा, बिश्नोई समाजाने केलं निर्णयाचं स्वागत

काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर न्यायालयाने बॉलिवूड अभिनेता सलमान खानला एक मोठा झटका दिला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Apr 5, 2018, 02:43 PM IST
सलमानला पाच वर्षांची शिक्षा, बिश्नोई समाजाने केलं निर्णयाचं स्वागत title=
File Photo

जोधपूर : काळवीट शिकार प्रकरणी बॉलिवूड अभिनेता सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याने सलमानची रवानगी जोधपूर सेंट्रल जेलमध्ये होणार आहे. जोधपूर न्यायालयाने अभिनेता सलमान खानला एक मोठा झटका दिला आहे.

बिश्नोई समाजाकडून निर्णयाचं स्वागत

जोधपूर येथील काळवीट शिकार प्रकरणीसलमान खानला ५ वर्षांची शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. जोधपूर न्यायालयाने दिलेल्या या निकालानंतर बिश्नोई समाजाकडून निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे.

सलमान दोषी तर इतर निर्दोष

काळवीट शिकार खटला निकालाच्यावेळी सलमानला दोषी ठरविण्यात आले. मात्र, सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणात सलमानवर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सलमानला रडू कोसळले

जोधपूर न्यायालयाने सलमानला पाच वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्याला एक मोठा झटका बसला. या निकालानंतर सलमानला रडू कोसळलं.

दोन्ही बहिणी ढसाढसा रडल्या

सलमान खानला शिक्षा सुनावल्यानंतर सलमानची बहीण अलबिराला रडू आल्याचं सांगण्यात येत आहे. सलमान खानच्या बहिणी त्यांच्या विषयी अधिक भावनिक आहेत. आज सलमानबरोबर बहिणी दिसल्या, पण भाऊ दिसत नव्हते, पण एकूणच सलमान खानला मोठा दिलासा आहे.

मी निर्दोष - सलमान

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरविले आहे. खटल्याला सुरुवात झाल्यानंतर सर्वात आधी सलमान खान याला त्याच्यावर ठेवण्यात आलेले आरोप मान्य आहेत का? असं न्यायालयाने विचारलं. त्यावेळी मी निर्दोष आहे, असे सांगत सलमान खानने सर्व आरोप फेटाळून लावले. यावेळी सलमान भावुक झाला होता.