'त्या' मुलीला प्रपोज करायला घाबरलो, 15 वर्षांनंतर भेटली तेव्हा...; Crush विषयी सलमान खानचा खुलासा

Salman Khan's Crush : सलमान खाननं एका कार्यक्रमात त्याच्या क्रशविषयी खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Mar 29, 2024, 10:00 AM IST
'त्या' मुलीला प्रपोज करायला घाबरलो, 15 वर्षांनंतर भेटली तेव्हा...; Crush विषयी सलमान खानचा खुलासा title=
(Photo Credit : Social Media)

Salman Khan's Crush : अभिनेता सलमान खानने त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अभिनेत्रींना डेट केले आहे. सलमान खानचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. यामध्ये तो सोमी अली पासून ते कटरीना कैफ ते ऐश्वर्या रायसोबत रिलेशनशिपमध्ये होता. पण यातलं एकही नातं टिकलं नाही आणि दोघेही वर्षभरात वेगळे झाले. संगीता बिजलानीसोबत तर सलमानच्या लग्नाची पत्रिकाही छापली गेली होती, पण काही कारणांमुळे हे नातेही संपुष्टात आले. पण आता सलमान खान 58 वर्षांचा झाला असून त्याची लग्नाची इच्छा दिसत नाही. मात्र त्याच्या चाहत्यांना अद्यापही भाईजानने लग्नबंधनात अडकावं असं वाटत आहे. पण तो दिवस कधी येणार हे त्याच्या चाहत्यांनाही माहिती नाही. मात्र अभिनेता सलमान खान हा एका अभिनेत्रीच्या प्रेमात होता. पण अशी परिस्थिती निर्माण झाली की दोघेही एकत्र येऊ शकले नाहीत आणि वेगळे झाले. पण जेव्हा सलमान खान जेव्हा त्याच्या प्रेमाला भेटला तेव्हा ती आजी झाली होती. 

पण एक मुलगी अशीही होती जिच्यावर सलमान खान प्रेम करत होता, पण ते वेळेत व्यक्त करू शकला नाही आणि सगळं फिस्कटलं. सलमाने त्याच्या या प्रेयसीबद्दल 'बिग बॉस 13' मध्ये भाष्य केलं होतं. त्यावेळी अभिनेत्री काजोल आणि अजय देवगन हे तानाजी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या कार्यक्रमात आले होते. तेव्हा काजोलने सलमानला तुला एखादी मुलगी आवडली असेल आणि तिला सांगता आलं नाही असं कधी झालं आहे का असं विचारलं. त्यावर बोलताना सलमान म्हणाला की, 'एक मुलगी होती जिला माझ्या मनातल्या भावना आणि प्रेमाबद्दल कधीच माहितं नव्हती. माझे तिच्यावर खूप प्रेम होते. मला ती खूप आवडायची. पण नकार मिळेल या भीतीने मी कधीच व्यक्त होऊ शकलो नाही.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सलमानने पुढे सांगितले की, "माझे तीन मित्र होते जे कधी ना कधी त्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होते. पण माझं तिच्यावर प्रेम होतं. मात्र, नकाराच्या भीतीने मी त्यावेळी मनातली गोष्ट सांगू शकलो नाही. मात्र बऱ्याच वेळानंतर मला कळालं की त्या मुलीचंही माझ्यावर प्रेम होतं. जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा फार दुःख झालं. मात्र, यापेक्षा मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा 19 वर्षांपूर्वी ती मुलगी मला भेटली. मी तिला पाहून आश्चर्यचकित झालो आणि त्यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या नाहीत हे बरे झालं असे वाटू लागले. खरंतर ती मुलगी आजी झाली होती".

हेही वाचा : 'ऐश्वर्या रायचं वजन वाढलं तेव्हा...' बिग बींच्या सुनेनं इतकं सहन केलं! रवीनाचा धक्कादायक खुलासा

"ती मुलगी आजी झाली होती आणि तिला मोठी मोठी नातवंडे होती. ती मला म्हणाली की माझी नातवंडे तुझे चाहते आहेत. त्यांना तुझे चित्रपट खूप आवडतात. मला ती मुलगी भेटली तेव्हा मी तिला ओळखलं नाही. मी तिला तू कोण आहेस असं विचारलं होतं. तेव्हा तिने तुझ्या लक्षात नाही का? असं म्हटलं. माझ्या डोक्यात जी मुलगी होती ती 15 वर्षानंतर पूर्णपणे बदलली होती", असे सलमान खानने म्हटलं.