ऐश्वर्या नव्हे, तर 'या' अभिनेत्रीच्या लग्नानंतर सलमानला बसला होता मोठा धक्का!

Salman Khan :  सलमान खानला ऐश्वर्या नाही तर या अभिनेत्रीच्या लग्नाची बातमी कळताच बसला होता मोठा धक्का... अभिनेत्यानं स्वत: केला खुलासा...

दिक्षा पाटील | Updated: Sep 16, 2023, 12:11 PM IST
ऐश्वर्या नव्हे, तर 'या' अभिनेत्रीच्या लग्नानंतर सलमानला बसला होता मोठा धक्का! title=
(Photo Credit : Social Media)

Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खाननं त्याच्या करिअरची सुरुवात ही रेखा यांच्यासोबत केली होती. रेखा यांच्या 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटातून सलमाननं मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. पण एक लीड अॅक्टर म्हणून त्याचा पहिला चित्रपट हा अभिनेत्री भाग्यश्रीसोबत असलेला 'मैंने प्यार किया' होता. 1989 मध्ये सूजर बडजात्याच्या 'मैंने प्यार किया' या चित्रपटात सलमान खान भाग्यश्रीसोबत दिसला होता. या चित्रपटानं सलमानला एक वेगळी ओळख मिळाली. चित्रपटातील त्याची आणि भाग्यश्रीची केमिस्ट्री ही प्रेक्षकांच्या चांगली पसंतीस उतरली होती. पण जेव्हा चित्रपटानंतर भाग्यश्रीनं लग्न केलं. त्यामुळे सलमानला खूप भीती वाटू लागली होती. 

सलमान खानचं फिल्मी बॅकग्राऊंड होतं असताना देखील त्याला खूप स्ट्रगल करावं लागलं. पण 90 च्या दशकात त्याला यश मिळालं. पण जेव्हा भाग्यश्रीचे लग्न झाले तेव्हा त्याला खूप जास्त टेन्शन आलं होतं. कारण सलमान आणि भाग्यश्रीच्या जोडीनं सगळ्यांचे लक्ष वेधले होते. त्यांच्या केमिस्ट्रीनं धमाल केली होती. त्या चित्रपटाआधी त्याला अनेकदा रिजेक्शनचा सामना करावा लागला. पण निर्मात्यांच्या बजेटला पाहता सलमानला चित्रपटात घेण्यात आले. पण निर्मात्यांनी घेतलेल्या या निर्णयावर त्यांना पश्चाताप झाला नाही. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भाग्यश्रीला या चित्रपटासाठी मानधन म्हणून 1.5 लाख रुपये मिळाले तर सलमान खानला फक्त 31 हजार मिळाले होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा सलमानला वाटलं की आता पुढे सगळं व्यवस्थित होणार. पण तसं झालं नाही... याचा खुलासा स्वत: सलमाननं एका मुलाखतीत केला होता. चित्रपट हिट झाल्यानंतर त्याचं संपूर्ण श्रेय हे भाग्यश्रीला मिळालं. तेव्हा मला वाटलं की चला पुढे जाऊन एकत्र आणखी चित्रपट करू तर चांगलं होईल. पण अचानक तिच्या लग्नाची बातमी मला मिळाली, तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला. कारण तेव्हा असं म्हटलं जात होतं की ती यापुढे चित्रपट करणार नाही. मला तर धक्काच बसला. 

हेही वाचा : जाऊ बाई जोरात! जो जोनसला घटस्फोट दिल्यानंतर 'या' अभिनेत्यासोबत सोफी टर्नरचं लिप लॉक

पुढे याविषयी सांगत सलमान खान म्हणाला होता की या चित्रपटानंतर मला सहा महिने काम मिळालं नव्हतं. कारण भाग्यश्रीनं लग्नाची घोषणा केली होती.  मला वाटलं की माझं करिअर संपलं, तेव्हा माझे वडील मला काम मिळावं यासाठी जिपी सिप्पी यांच्याशी बोलले. मग काय त्यानंतर मॅगझिनमध्ये आलं की जिपी सिप्पी यांनी मला साइन केलं आहे. त्यावेळी रमेश तोरानी त्याच्याकडे पाच लाख रुपये घेऊन गेले आणि आगामी चित्रपटात काम करण्यासाठी विचारले. त्यानंतर मला काम मिळू लागलं. 'मैंने प्यार किया' या चित्रपटात सलमाननं प्रेम ही भूमिका साकरली होती. त्यानंतर सलमान अनेक चित्रपटामध्ये प्रेम या भूमिकेत दिसला. त्याचे हे सगळेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले.