...आणि सलमानची नजर कतरिनावर खिळली !

बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान आणि कतरिना कैफच्या 'टाइगर जिंदा है' या आगामी चित्रपटाची लोक आतुरतेने वाट पहात आहेत. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 12, 2017, 01:09 PM IST
...आणि सलमानची नजर कतरिनावर खिळली ! title=

नवी दिल्ली : बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान आणि कतरिना कैफच्या 'टाइगर जिंदा है' या आगामी चित्रपटाची लोक आतुरतेने वाट पहात आहेत. या चित्रपटात खूप काळानंतर सलमान आणि कतरिना एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचे अपडेट्स फोटोजच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचत होते. कारण चित्रपटाचे दिग्दर्शक अब्बास जफर, कतरिना किंवा कधी सलमान शूटींगचे फोटोज सोशल मीडियावर शेयर करत होते. नुकताच सेट वरचा अजून एक फोटो समोर आला आहे. 

हा फोटो चित्रपटाचे दिग्दर्शक अब्बास यांनी ट्विटरवर शेयर केला असून त्यात कतरिना आपल्या मोबाईलमध्ये बाहेरील दृश्य बंधिस्त करत आहेत तर सलमानची नजर कतरिनावर खिळलेली आहे. 

 

‘टाइगर ज़िंदा है’ हा चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. ईदला प्रदर्शित झालेला सलमानचा ‘ट्यूबलाइट’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास चालला नाही. म्हणून आता 'टाइगर जिंदा है' काय कमाल करतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.