2 मुलं असलेल्या क्रिकेटपटूच्या प्रेमात वेडी होती 'ही' अभिनेत्री... धर्मांतर करुन लग्न केलं अन् झाली फसवणूक

Actress was in love with married cricketer : या अभिनेत्रीनं विवाहीत क्रिकेटरशी लग्न करण्यासाठी बदलला धर्म पण...  लग्नाच्या काही वर्षात झाली फसवणूक

दिक्षा पाटील | Updated: Apr 7, 2024, 01:10 PM IST
2 मुलं असलेल्या क्रिकेटपटूच्या प्रेमात वेडी होती 'ही' अभिनेत्री... धर्मांतर करुन लग्न केलं अन् झाली फसवणूक  title=
(Photo Credit : Social Media)

Salman Khan's Ex Girl Friend : बॉलिवूड आणि क्रिकेटचं खूप जुनं नातं आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी क्रिकेटर्ससोबत लग्न केलं. त्यात शर्मिला टागोर, अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टी अशा अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटपटूंशी लग्न केलं. आज आपण अशा एका अभिनेत्री विषयी जाणून घेणार आहोत जिनं प्रेमासाठी तिचं करिअर सोडलं. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही अभिनेत्री कोण आहे... तर त्या अभिनेत्रीचं नाव संगीता बिजलानी आहे. 

संगीताच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर ती बराच काळ सलमान खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. इतकंच नाही तर सलमान खानसोबत लग्न देखील करणार होती. त्यांच्या लग्नाची पत्रिका देखील छापली गेली होती मात्र, त्या आधीच त्याचं लग्न तुटलं. सलमान खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर संगीता बिजलानी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद अजहरुद्दीनच्या प्रेमात होती. काही काळानंतर ते दोघं रिलेशनशिपमध्ये आहे. पण सगळ्यात लक्ष वेधी गोष्ट म्हणजे मोहम्मद अजहरुद्दीनचं आधीच लग्न झालं असून त्याला दोन मुलं देखील होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

संगीताला मोहम्मद अजहरुद्दीनवर इतकं प्रेम होतं की त्याच्यासोबत तिनं लग्न केलं. मोहम्मद अजहरुद्दीनसोबत लग्न करण्यासाठी संगीतानं इस्लाम धर्म स्विकारला. 1996 मध्ये लग्न बंधनात अडकलेल्या या कपलं 2010 मध्ये घटस्फोट घेतला. रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या घटस्फोटा मागचं कारण बॅडमिन्टनपटू ज्वाला गुट्टा होती. त्या दोघांचं अफेअर असल्याचे म्हटले जात होते. मात्र, मोहम्मदनं कधीच त्याच्या आणि ज्वाला गुट्टासोबतच्या नात्यावर कोणतंही वक्तव्य केलं नाही. त्यामुळे यात किती तथ्य आहे हे सांगता येत नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

संगीता बिजलानीनं मॉडेलिंगपासून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. तर तिला 1980 मध्ये ‘मिस इंडिया’ चा खिताब तिच्या नावावर केला. ‘मिस इंडिया’ चा खिताब जिंकल्यानंतर संगीतानं ‘मिस यूनिवर्स’ मध्ये देशाचे प्रतिनिधित्व करत होती. पण ती विजेती ठरली नाही.  त्यानंतर संगीतानं 1988 मध्ये ‘कातिल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात संगीता बिजलानी आणि आदित्य पांचोली यांची महत्त्वाची भूमिका आहे. तर या चित्रपटात शक्ति कपूर, अमजाद खान आणि किरण कुमार यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका होत्या. 

हेही वाचा : Pushpa 2 मध्ये अल्लू अर्जुनसह झळकणार डेव्हिड वॉर्नर! क्रिकटपटूनेच दिली हिंट

दरम्यान, या चित्रपटानंतर 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हथियार’ या चित्रपटात संगीता दिसली होती. या चित्रपटात धर्मेंद्र, संजय दत्त, ऋषि कपूर, अमृता सिंह  या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. तर 3.1 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आलेला या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 7.4 कोटींची कमाई केली होती.