कपड्यांविना सलमान खानला पाहून एक्सगर्लफ्रेंडने केलं हे काम

बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा एक फिटनेस फ्रीक आहे.

Updated: Dec 21, 2021, 04:12 PM IST
कपड्यांविना सलमान खानला पाहून एक्सगर्लफ्रेंडने केलं हे काम title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा एक फिटनेस फ्रीक आहे. अभिनयासोबतच तो त्याच्या फिट बॉडीमुळेही चर्चेत असतो. 55 वर्षीय सलमान फिटनेसच्या बाबतीत तरुण कलाकारांनाही मागे टाकतो. सलमान खानने आता स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या फोटोला सलमानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीही स्वत:ला कमेंट करण्यापासून रोखू शकलेली नाही.

एक्स गर्लफ्रेंडची फोटोवर कमेंट
सलमान खानने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तो शर्टलेस दिसत आहे. या फोटोमध्ये त्याने टोपी घातल्याचं दिसत आहे. . फोटो पोस्ट करत सलमानने कॅप्शनमध्ये लिहिले, 'ही being human ची टोपी चांगली आहे ना? फोटोमध्ये सलमान खान त्याचे सिक्स पॅक अॅब्स फ्लॉंट करताना दिसत आहे. सलमानच्या या फोटोवर एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीने प्रतिक्रिया दिली आहे. कमेंट सेक्शनमध्ये फायर इमोजी शेअर करत संगीताने आपली प्रतिक्रीया दिली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सलमान खानचे चाहते त्याचं कौतुक करताना थकत नाहीयेत. एका चाहत्याने लिहिलं, तुम्हीपण काय जोक करता, जेव्हा तुम्ही शर्टलेस असता, तेव्हा तुमच्या टोपीकडे कोणाचं लक्ष जाईल. तर  एका चाहत्याने लिहिलं, ईस्ट और वेस्ट भाई की बॉडी सबसे बेस्ट. सलमानच्या या फोटोला 10 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. सलमान खान आणि संगीता बिजलानी 90 च्या दशकात एकमेकांना डेट करत होते अशी माहिती आहे. दोघंही लग्न करणार होते, पण काही कारणास्तव हे होऊ शकलं नाही.