लग्न नाही तर Salman Khan नं केलं होतं बाळाचं प्लॅनिग! अभिनेत्याचा खुलासा; म्हणाला "काही वर्षांपूर्वी..."

Salman Khan : सलमान खाननं काही वर्षांपूर्वी वडील होण्याचा निर्णय घेतला होता याविषयी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. तर याशिवाय सलमाननं या मुलाखतीत त्याच्या लग्नाविषयी आणि रिलेशनशिपविषयी देखील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 30, 2023, 01:42 PM IST
लग्न नाही तर Salman Khan नं केलं होतं बाळाचं प्लॅनिग! अभिनेत्याचा खुलासा; म्हणाला "काही वर्षांपूर्वी..." title=
(Photo Credit : Salman Khan Instagram)

Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ईदच्या निमित्तानं सलमाननं त्याच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. सलमानच्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा आकडा पार केला आहे. दरम्यान, सलमाननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या खासगी आयुष्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यात त्याचं लग्न, रिलेशनशिप आणि वडील होण्याची इच्छा. अशा अनेक गोष्टींविषयी सलमाननं या मुलाखतीत सांगितले होते.

सलमाननं नुकतीच रजत शर्मा यांच्या ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात हजेरी लावत मुलाखत दिली होती. यावेळी सलमानला त्याच्या खासगी आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. यावेळी सलमाननं कोणत्याही गोष्टीचा विचार न करता मोकळेपणानं उत्तर दिली आहे. याच वेळी सलमाननं त्याची वडील होण्याच्या इच्छेविषयी सांगितलं. काही वर्षांपूर्वी त्याच्या मनात वडील होण्याची इच्छा आली होती पण तो यशस्वी का होऊ शकला नाही याविषयी त्यानं सांगितलं. सलमाननं पत्नीसाठी नाही तर बाळाची प्लॅनिंग केली होती. पण त्यावेळी तसा कायदा नव्हता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावेळी रजत शर्मा यांनी सलमानला प्रश्न विचारला की तू करणला हा प्रश्न विचारला होता की त्यानं लग्न का केलं नाही आणि आज त्याला दोन मुलं आहेत. त्यावर सलमान उत्तर देत म्हणाला, 'मी देखील तोच प्रयत्न करीत होतो पण कायद्यामध्ये काही बदल झाले. मला लहान मुलं फार आवडतात. पण मुलं असतात तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांची आई देखील येते. मुलांसाठी आईही नेहमीच महत्त्वाची असते आणि आमच्या घरी आईचं प्रेम देणाऱ्या अनेक महिला आहेत. त्या सगळ्या मुलांची खूप चांगली काळजी घेतील. आमच्याकडे पूर्ण जिल्हा आहे, पूर्ण गाव आहे. मुलांची आई ही माझी पत्नी असेल. सलमानचा त्याचे भाऊ अरबाज आणि सोहेलच्या मुलांसोबत खूप चांगले नाते आहे. 

हेही वाचा : ...अन् संतापाच्या भरात Sharad Kelkar ने हाताने फोडली काच, पडले होते 150 टाके

सलमान खानच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्यानं शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. तर लवकरच त्याचा 'टायगर 3' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपचात त्याच्यासोबत कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यासोबत शाहरुख आणि सलमान टायगर वर्सेस शाहरुख या चित्रपटात देखील दिसणार आहे.